नाशिक: नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षी सप्ताहनिमित्त शनिवारी सकाळी पक्षी गणना करण्यात आली. विविध पाणपक्षी, झाडांवरील गवताळ भागातील पक्षी अशा नऊ हजार १०३ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यंदा पावसाळा लांबल्याने आणि थंडीचे आगमन उशीरा झाल्याने स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन कमी प्रमाणात झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षी सप्ताह सुरू आहे. शनिवारी हंगामातील दुसरी मासिक पक्षी गणना करण्यात आली. यामध्ये स्थानिक मार्गदर्शक, पक्षीमित्र, वन्यजीव अभ्यासक, स्वयंसेवक यांच्या मदतीने पक्षी गणना करण्यात आली. अभयारण्यातील चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, मध्येश्वरी गोदावरी नदीपात्र, कोटुर, कुरूडगाव, काथरगाव अशा सात ठिकाणी ही गणना झाली. यामध्ये विविध पाणपक्षी, झाडांवरील, गवताळ भागातील पक्षी असे सहा हजार ९०५, पाणपक्षी दोन हजार १९८ अशा नऊ हजार १०३ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. या मध्ये विदेशातील स्थलांतरीत पक्ष्यांची नोंद झाली आहे.

हेही वाचा : शेगावातील राहुल गांधी यांच्या सभेला जळगावातून सोळा हजार कार्यकर्ते जाणार; काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार

कॉमन क्रेन, नॉर्द शॉवलर, पिनटेल, गार्गनी, युरेशियन व्हिजन, गडवाल, रुडी शेल डक, मार्श हरियर, ब्लू थ्रोड, ब्लु चिक बी ईट तर स्थानिक स्थलांतर पक्षी मध्ये उघड्या चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, स्पुनबिल, रिव्हीर टर्न, कमळपक्षी, शेकाट्या, जांभळी पाणकोंबडी, नदीसुरय आदी पक्षी आढळून आले.