नाशिक जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित आनंद दिघे महाआरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत शिबीर सुरू राहणार असून आतापर्यंत ७ लाख ९१ हजार ६०२ रग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
हेही वाचा- धुळे जिल्ह्यात मद्य सेवनाचे पाच लाख परवाने वितरीत
तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पोहचावी, रुग्णांना आरोग्य विषयक तक्रार असल्यास त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी महाआरोग्य अभियान अंतर्गत शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांहून अधिकचा कालावधी झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ लाख ९१,६०२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील आवश्यक एक हजार, ७८४ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पुढील उपचारासाठी एक हजार ११८९ रुग्णांना संदर्भीत करण्यात आले आहे. अधिकाधिक रुग्णांनी महाआरोग्य अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.