जळगाव : पाचोरा- कजगावदरम्यान सुमारे नऊ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळणी झाली असून तो तत्काळ दुरुस्त करावा, या मागणीसाठी मंगळवारी महाविकास आघाडीतर्फे एकाच वेळी साखळी पद्धतीने पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे सकाळी आठला, पाचोरा येथील जारगाव चौफुलीवर सकाळी साडेदहाला, भडगाव येथे सकाळी दहाला, नगरदेवळा येथे सकाळी साडेदहाला आणि कजगाव येथे सकाळी साडेदहाला सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पाचोरा तालुक्यातील जळगाव-पाचोरा-कजगावदरम्यान सुमारे नऊ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळणी झाली असून, नांद्रा, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा व कजगावसह परिसरातील ग्रामस्थांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात अनेकदा निवेदने देऊनही महामार्ग विभागाच्या अधिकार्यांकडून अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आला. अखेर महाविकास आघाडीतर्फे मंगळवारी एकाच वेळी साखळी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता.
जारगाव चौफुली येथे माजी आमदार दिलीप वाघ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विकास पाटील, भूषण वाघ, बशीर बागवान, अशोक मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, खलिल देशमुख, शहराध्यक्ष अजहर खान, शालिग्राम मालकर, महिला आघाडीच्या ज्योती वाघ, सुलोचना वाघ, सरला पाटील, रेखा देवरे, जयश्री मिस्तरी, पी. डी. भोसले, रणजित पाटील, सुदर्शन महाजन, हरुन देशमुख, तारीक अहमद, सय्यद रज्जू बागवान, अॅड. अविनाश सुतार, सुदाम वाघ, बाबाजी ठाकरे, गोकुळ पाटील, वाजीद बागवान, गोपी पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण, माजी सभापती शेख इस्माईल शेख फकिरा, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष इरफान मणियार, अमजद मौलाना, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, एस. सी. आघाडीचे तालुकाध्यक्ष श्रावण गायकवाड, चंद्रकांत महाजन, इस्माईल तांबोळी, फईम शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत आदी सहभागी होते.
हेही वाचा >>> जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या राजीनाम्याविषयी उद्या निर्णय
तालुक्यातील नांद्रा, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा व कजगाव या ठिकाणी एकाच वेळी साखळी पद्धतीने सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलनात करण्यात आले. जारगाव येथे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता विजय वाघ, शाखा अभियंता पोतदार यांनी भेट देऊन पाच मार्चपर्यंत रस्त्याच्या कामांची निविदा काढण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. आंदोलनामुळे पाचोरा ते भडगाव रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसून आले.