लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी स्थापन केलेल्या आणि शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकहितवादी मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक मुकूंद कुलकर्णी यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.

लोकहितवादीच्या वार्षिक सभेत मावळते अध्यक्ष जातेगावकर यांनी अध्यक्षपदासाठी मुकूंद कुलकर्णी यांच्या नावाची घोषणा केली. सर्वानुमते त्याला मंजुरी देण्यात आली. यावेळी जातेगावकर यांनी तात्यासाहेब शिरवाडकर यांनी आपणाकडे अध्यक्षपदाची सुत्रे दिली होती. आज बावीस वर्षानंतर ती कुलकर्णी यांच्याकडे सोपवित असल्याचे सांगितले. यापुढे संस्था जी काही जबाबदारी सोपविणार ती स्विकारण्यास तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले. नुतन अध्यक्ष कुलकर्णी यांनी लोकहितवादी मंडळात १९७९ मध्ये आल्यानंतर आज ४० ते ४२ वर्षानंतर अध्यक्षपदी विराजमान झाल्याचा आनंद व्यक्त केला. संस्था अधिक नावारुपाला आणण्याचा प्रयत्न करणार, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- भिंतीखाली दबून तीन कामगारांचा मृत्यू, चाळीसगावात गटार बांधकाम करताना दुर्घटना

यावेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी लक्ष्मण सावजी, संजय करंजकर, भगवान हिरे, कार्याध्यक्षपदी डॉ. प्रशांत पाटील, सचिव सुभाष पाटील, सहसचिव फणिंद्र मंडलिक, किरण समेळ, खजिनदार चंद्रकांत दीक्षित, कार्यकारिणी सदस्यपदी प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे, अपूर्वा शौचे, सागर संत, आदित्य समेळ, विक्रम सोनवणे यांची निवड करण्यात आली.

Story img Loader