लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: मालमत्ता कर वसुलीसाठी जाहीर केलेल्या सवलत योजनेमुळे महापालिकेला खऱ्या अर्थाने धनलाभ झाला आहे. नव्या आर्थिक वर्षात एक एप्रिल ते १६ जून या अडीच महिन्यातच तब्बल ७७ कोटींचा कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे. मालमत्ता करात सध्या तीन टक्के सवलत मिळत असून ३० जूनपर्यंत तिचा लाभ मिळणार आहे. एक जुलैपासून दोन टक्के दंड लागू होणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

पुणे जिल्ह्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे, ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
Loksatta coverage on Mumbai BMC budget 2025 in marathi
रुपये ७४,४२७,४१,००० फक्त!, मुंबई महापालिकेच्या जवळपास पाऊण लाख कोटींच्या अजस्र अर्थसंकल्पातून होणार काय?
kumbh mela news in marathi
कुंभमेळा पूर्वतयारीसाठी अभियंत्यांना नाशिक महापालिकेत सेवेचे दरवाजे खुले, आस्थापना खर्चाच्या मर्यादेची अट शिथील
Mumbai coastal road development information in marathi
सागरी किनारा मार्गालगत हिरवळ आणि नागरी सुविधा… पण यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांची मदत का? मुंबई महापालिकेकडून निधी का नाही?
To meet its budget target Pune municipal corporation plans to collect Rs 10 crore daily in taxes
दररोज १० कोटीची वसुली करा, कोणी दिले आदेश !
Nashik municipal corporation complaints news in marathi
नाशिक महापालिकेवर तक्रारींचा भडीमार;अतिक्रमणांशी संबंधित सर्वाधिक तक्रारी

मालमत्ता कराची वसुली महापालिकेसमोर दिव्य असते. २०२३-२४ या वर्षात कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेने सवलत योजना जाहीर केली. त्या अंतर्गत एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरणाऱ्यांना आठ टक्के, मे महिन्यात कर भरणाऱ्यांना सहा टक्के तर जून महिन्यात कर भरणाऱ्यांना तीन टक्के सवलत दिली गेली. त्यास मालमत्ताधारकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अडीच महिन्यात ७७ कोटी दोन लाखांची वसुली झाली आहे.

एप्रिल महिन्यात आठ टक्के सवलतीचा लाभ घेऊन एक लाख २७ हजार ९६५ करदात्यांनी आगाऊ कर भरुन योजनेचा लाभ घेतला. मे महिन्यात सहा टक्के सवलतीचा लाभ घेऊन २९ हजार ६९५ करदात्यांनी तर एक जून ते १६ जून या कालावधीत ३० हजार १३३ करदात्यांनी तीन टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. जून महिन्याचे आता १४ दिवस शिल्लक आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी सवलतीचा लाभ घेत ३० जूनपर्यंत कर भरुन मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी केले आहे.

आणखी वाचा-नाशिक: मनपाची पटसंख्या वाढीसाठी ‘मिशन ॲडमिशन’ मोहीम

दरम्यान, चालू आर्थिक वर्षांपासून मनपाने गृहनिर्माण संस्था, मालमत्ताधारकांना अन्य काही विशिष्ट बाबींवर सवलत जाहीर केली आहे. त्यात सौर उर्जा (गरम पाणी, वीज) – पाच टक्के, पावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) – पाच टक्के, सांडपाण्याचा पुनर्वापर – पाच टक्के, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र – दोन टक्के यांचा समावेश आहे. याशिवाय ऑनलाईन संपूर्ण कराचा भरणा केल्यास वरील सवलतीसह सर्वसामान्य करात पाच टक्के किंवा अधिकतम तीन हजार रुपयांची सवलत मिळणार असल्याचे मनपाने म्हटले आहे.

देयकांची प्रतीक्षा करु नका

मालमत्ताधारकांच्या चालू देयकावर किंवा थकबाकीवर एक जुलै २०२३ पासून दोन टक्के दंड लागू होणार आहे. त्यामुळे सर्व मालमत्ताधारकांनी देयक अद्याप मिळाले नसले तरी मागील वर्ष देयकाच्या इंडेक्स क्रमांकावर सवलतीचा लाभ घ्यावा. तसेच एनएमसीटॅक्स डॉट इन आणि एनएमसी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर भरणा करून नागरिक सवलत प्राप्त करू शकतात, असे आवाहन मनपाच्या कर विभागाने केले आहे.

Story img Loader