नाशिक : नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महानगरपालिका आणि त्र्यंबक नगरपालिकांसह अन्य काही आस्थापनांनी अपेक्षित खर्चाचा आराखडा सादर केला आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर परिसरातील अन्य तीर्थक्षेत्रांचा विकास, भाविक तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह अन्य मुद्यांवर मंगळवारी आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.

नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने यंत्रणांनी आराखडा सादर करतांना आवश्यक सर्व बाबींचा आराखड्यात समावेश करावा, परस्पर समन्वयातून सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना अधिकाऱ्याना दिल्या.

thieve with koyta roaming arround in New Nashik
नवीन नाशिकमध्ये कोयताधारींचा धुडगूस
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
america president donald Trump Benjamin Netanyahu statement Gaza palestine unrest in Middle East
गाझावर आमचे राज्य… पॅलेस्टिनींनी जावे इतरत्र…! ट्रम्प यांच्या दाव्याने पुन्हा पश्चिम आशियात अस्थैर्य?
Israeli Palestinian Conflict
अन्वयार्थ : अरबांची जरब…
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Slogans raised against Kirit Somaiya Malegaon fake certificates Rohingya Bangladeshi infiltrators residents
मालेगावात किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी, बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
waqf amendment bill 2025
Waqf Bill: वक्फ विधेयकाला जेपीसीची मंजूरी; वक्फ बोर्डावर बिगर मुस्लीम सदस्य असणार, विरोधकांना आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत

हेही वाचा…नाशिक शहरासाठी ६२०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची गरज, गतवर्षीच्या वापरापेक्षा ५३२ दशलक्ष घनफूट अधिक

बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिाता झगडे, प्रदीप चौधरी, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी आदी उपस्थित होते.

बैठकीत त्र्यंबकेश्वरच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके यांनी सुधारीत ५२२ कोटींचा सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याचे सादरीकरण केले. सिंहस्थ कालावधीतील नाशिक शहर, कावनई, सर्वतीर्थ टाकेद येथील प्रस्तावित रस्त्यांची कामे, जिल्ह्यातील विश्रामगृह इमारतींची कामे, भाविकांसाठी करावयाच्या सुविधा अशा एकूण ४० कोटींच्या आराखड्याचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता शर्मा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पालवे यांनी केले. यांनतर नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयाचा सिंहस्थविषयक आराखडा पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी तर, महावितरणचा आराखडा अधीक्षक अभियंता डी.एच. पडळकर यांनी सादर केला.

हेही वाचा…आरोग्य विद्यापीठातर्फे फार्माकोलॉजी परीक्षेच्या तारखेत बदल

खांडवी यांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, अन्नांची पाकिटे, वाहन खरेदी, भाडेतत्वावरील वाहन, सुटे भाग, तात्पुरते रुग्णालय, ड्रोन कॅमेरे आदी कामांसाठी १११२.१८ कोटीचा निधी लागेल, असे सांगितले.

Story img Loader