लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात वर्षभरासाठी तपोवनात वसविल्या जाणाऱ्या साधुग्रामच्या जागेचा उर्वरित ११ वर्षे कसा वापर करता येईल, यासाठी नागरिकांच्या संकल्पनेतून प्रकल्प साकारण्याची तयारी महापालिकेने केली आहे. दर बारा वर्षांनी ही जागा साधुग्रामसाठी वापरली जाईल. त्यादृष्टीने या ठिकाणी काढता येणारे अथवा कायम स्वरुपातील रचना व संकल्पनांची महापालिकेला अपेक्षा आहे. या माध्यमातून उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. २०१५ च्या कुंभमेळ्यानंतर बाजूला पडलेला जागेचा विषय दशकभरानंतर पुढे आला. तपोवन परिसरात साधुग्रामसाठी ३१८ एकर जागा निश्चित केलेली आहे. हा संपूर्ण परिसर ना विकास क्षेत्र म्हणून घोषित आहे. गोदावरी काठालगतच्या या जागेचा १२ वर्षातून एकदा होणाऱ्या कुंभमेळ्यात वापर होतो. देशभरातून येणाऱ्या लाखो साधू-महंतांची व्यवस्था साधूग्राममध्ये केली जाते. सिंहस्थाचा वर्षभराचा कालावधी वगळता उर्वरित ११ वर्षात या जागेचा कुठलाही वापर होत नाही. अधिग्रहण न झालेल्या जागेवर काही जमीनमालक शेती करतात.
आणखी वाचा-व्यापाऱ्यांकडून १२०० द्राक्ष उत्पादकांची ४७ कोटींना फसवणूक
आरक्षित जागेचा वर्षभरासाठी साधुग्राम आणि उर्वरित ११ वर्षात अन्य प्रयोजनासाठी कसा वापर करता येईल, यावर मंथन होत आहे. त्या अनुषंगाने सुयोग्य वापरासाठी विविध पर्याय, संकल्पना व सूचना करण्याचे आवाहन नगरनियोजन विभागाने नागरिकांना केले आहे. हे क्षेत्र १२ वर्षांनी पुन्हा साधुग्रामसाठी वापरता येईल, अशा प्रकारच्या संकल्पना आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले. नागरिकांनी आपल्या संकल्पना व पर्याय ३१ जानेवारीपर्यंत शरणपूर रस्त्यावरील मनपाच्या नगरनियोजन विभागाकडे पाठविण्यास सांगण्यात आले आहे. या संकल्पना व सूचनांचा अभ्यास करून लोकाभिमुख प्रकल्प साकारण्याचे नियोजन आहे. या जागेच्या वापरातून महापालिकेला उत्पन्नही मिळेल याचाही विचार करण्यात आला आहे.
जागेची सद्यस्थिती
गोदावरी काठालगत तपोवन परिसरातील सुमारे ३१८ एकर जागा साधुग्रामसाठी निश्चित केलेली आहे. हा परिसर ना विकास क्षेत्र असून यातील ५४ एकर जागा आतापर्यंत महाालिकेने कायमस्वरुपी संपादित केलेली आहे. उर्वरित २६४ एकर जमीन कुंभमेळ्याच्या एक वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर घेतली आहे.
आणखी वाचा-नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
कायमस्वरुपी अधिग्रहणाचा प्रयत्न
साधुग्रामसाठी उर्वरित २६४ एकर जागा टीडीआरच्या मोबदल्यात घेण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यासाठी पाच टीडीआर देण्याची विनंती राज्य सरकारला करण्यात आली. जेणेकरून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, ही जमीन कायमस्वरूपी अधिग्रहित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.