जम्मू-काश्मीरमधील उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद मंगळवारीही उमटले. या हल्ल्याच्या निषेधार्थ राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले असताना मनमाड शहरातील मुस्लीम बांधवांनी एकात्मता चौकात निदर्शने करत पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनात प्रमुख मशिदीतील मौलानांसह मुस्लीम बांधव व नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले. फुले, शाहू आंबेडकर विचार मंचने या आंदोलनाचे आवाहन केले होते. दुसरीकडे शिवसेनेनेही तुफान चौकात पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्यासह राष्ट्रध्वज दहन केला.

रविवारी पहाटे उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील चार जवानांचा समावेश आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ जनमानसातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून ठिकठिकाणी पाकिस्तानचा निषेध केला जात आहे. मंगळवारी शहरात मुस्लीम बांधवांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली.

sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

शहीद जवान तुझे सलाम, भारत माता की जय, भ्याड हल्ल्याचा निषेध असो.. यासह पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. जामा मशिदीचे मौलाना असलम रझवी यांनी वाढत्या दहशतवादी घटनांवर चिंता व्यक्त केली. भारतीय लष्कराच्या छावणीवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. मुस्लीम बांधव या घटनेचा निषेध करीत असून केंद्र सरकारने या हल्ल्याविरोधात चोख उत्तर देण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. यावेळी मिर्झा अहमद बेग, फिरोज शेख, विठ्ठल नलावडे आदींची भाषणे झाली. मुस्लीम बांधवांनी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

यावेळी उद्योगपती जहीर सेठ, हाजी मसूद, मसूद अहेमद, मौलाना मो. उस्मान, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ  पगारे, शेख मुख्तार, आदी सहभागी झाले होते.

मंडळ अधिकाऱ्यांना या घटनेचा निषेध करणारे निवेदन देण्यात आले. दरम्यान, शिवसेनेतर्फे तुफान चौकात पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा प्रतीकात्मक पुतळा व राष्ट्रध्वज दहन केला.