आईसह मुलगीही बेपत्ता झाल्याची तक्रार

नाशिक : चांदगिरी गावाजवळील कडवा कालव्याच्या पाटात एक वर्षांच्या बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. परंतु, त्याची आई आणि बहीण अजूनही बेपत्ता असल्याने या मृत्यूचे गूढ वाढले आहे.  नाशिकरोड पोलीस ठाण्यात बालकाच्या मामाने आईसह मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार के ली आहे.

चांदगिरी गावाजवळ घाट असून पावसामुळे या ठिकाणी नाल्यांना पाणी आहे. बुधवारी रात्री पाटाला पाणी सोडण्यात आले असता पाण्यात एका बालकाचा मृतदेह तरंगताना आढळला. नाशिकरोड पोलिसांना याविषयी माहिती देण्यात आल्यावर त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. शिंदे गावात राहणारे कमलेश पाडवी  हे पत्नी दीपाली, मुलगी राजश्री, तसेच आठ आणि एक वर्षांच्या मुलांसोबत राहतात.

गुरुवारी सकाळपासून त्यांची पत्नी, मुलगी आणि एक वर्षांचा मुलगा बेपत्ता होते. त्यांनी पत्नीच्या माहेरी संपर्क साधला असता मुले आणि पत्नी त्या ठिकाणी आढळून आले नाहीत. त्यामुळे बालकाच्या मामाने  नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, बुधवारी रात्री सापडलेला एक वर्षांचा बालक पाडवी यांचा बेपत्ता असलेला मुलगा असल्याचे उघड झाले. पाडवी यांची पत्नी आणि मुलगी अद्याप बेपत्ता आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आई आणि मुलगी सापडत नाही, तोपर्यंत बालकाच्या मृत्यूचे गूढ  कायम आहे.

Story img Loader