विरोधी पॅनलचा धुव्वा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जवळपास पाच वर्षे प्रशासकीय कारकीर्दीचा अनुभव घेणाऱ्या नाशिक मर्चंट्स सहकारी (नामको) बँकेच्या चुरशीच्या निवडणुकीत प्रगती पॅनलने विरोधी पॅनलचा धुव्वा उडवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. माजी आमदार वसंत गीते, सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या. विरोधी सहकार आणि नम्रता पॅनलला एकही जागा मिळाली नाही. नगरसेवक गजानन शेलार यांच्यासह कधीकाळी बँकेचे सर्वेसर्वा राहिलेल्या हुकूमचंद बागमार यांच्या कुटुंबीयांनाही पराभवाचे धक्के सहन करावे लागले. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रगती पॅनलच्या उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला.
जिल्ह्य़ातील व्यापारी वर्गाची प्रमुख बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मर्चंट्स बँकेची १० वर्षांनंतर झालेली ही निवडणूक सर्वानी प्रतिष्ठेची केली. माजी आमदार वसंत गीते, सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनल, अजित बागमार यांचे नम्रता पॅनल, गजानन शेलार, अजय ब्रम्हेचा यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल यांच्यात ही लढत झाली. २१ जागांसाठी ८२ उमेदवार रिंगणात होते. बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तिन्ही पॅनलने कंबर कसली होती. मतदानात मतदारांचा निरुत्साह पाहावयास मिळाला. केवळ ३६.२१ टक्के मतदान झाले होते. कमी मतदानाचा लाभ कोणाला होणार, यावर चाललेले तर्कवितर्क मतमोजणीनंतर थांबले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांच्या उपस्थितीत सलग दोन दिवस अंबड येथील संभाजी स्टेडियममध्ये मतमोजणी झाली. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दोन-तीन जागांचा अपवाद वगळता सर्वच जागांवर प्रगती पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. अखेरच्या फेरीत उर्वरित जागांवर प्रगतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. प्रगती पॅनलचे वसंत गीते (३२,४६८), सोहनलाल भंडारी (२९,०५४), विजय साने (२६,५७३), रंजन ठाकरे (२६,८९०), शोभा छाजेड (३४,१०८) आदींनी विजय मिळवत विरोधी दोन्ही पॅनलचा पुरता धुव्वा उडवला. अनेक दिग्गजांना पराभवाला तोंड द्यावे लागले. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर प्रगती पॅनलने एकहाती बँक ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे.
पंधराशे कोटींच्या ठेवी असणाऱ्या बँकेचे तीन राज्यांत कार्यक्षेत्र आहे. प्रशासकीय काळात वाढलेला बँकेचा एनपीए, चुकीच्या पध्दतीने झालेली प्रशासकाची नेमणूक, कमीत कमी व्याज दराने छोटय़ा व्यावसायिकांना कर्जपुरवठा, बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्याचे मुद्दे प्रचारात मांडले गेले. परस्परविरोधात शड्डू ठोकणाऱ्या पॅनलमध्ये मतभेद झाले. अखेर प्रगती पॅनलची सरशी झाली.
विजयी उमेदवार
वसंत गीते, सोहनलाल भंडारी, रंजन ठाकरे, प्रफुल्ल संचेती, विजय साने, अशोक सोनजे, शोभा छाजेड, रजनी जातेगावकर, प्रशांत दिवे, नरेंद्र पवार, सुभाष नहार, हरीश लोढा, कांतीलाल जैन, अविनाश गोठी, सुरेश दंडगव्हाळ, भानुदास चौधरी, महेंद्र बुरड, संतोष धाडीवाल, शिवदास डागा, हेमंत धात्रक, प्रकाश दायमा.