नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर पाणी आले असून ग्रामीण भागाचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. नवापूरमधील शहरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले असून रंगावली नदीला पूर आला आहे. शुक्रवारी सकाळी काही वेळ नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवापूर शहरासह परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. नवापूर शहराची जीवनदायीनी समजली जाणारी रंगावली नदी दुथडी भरून वाहत आहे. मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने नवापूर शहरातील इंदिरानगर, बजरंग चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, प्रभाकर कॉलनी, इस्लामपुरा, देवळफळी आदी भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांनी रात्र जागून काढली. नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागाचा अनेक ठिकाणी पावसामुळे संपर्क तुटला आहे. वीज पुरवठा खंडित झाला आहे.

हेही वाचा…भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

पश्चिम रेल्वे विभागाचा नागपूर-सुरत रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पाणी शिल्याने रुग्णांचे हाल झाले. नवापूर तालुक्यातील रायपूर नेसू, सरफणी आधी नदीला पूर आला आहे. धायटा परिसरातील मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. खांडबारा- डोगेगाव रस्तावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दोन दिवसापासून झालेल्या पावसाने पिकांना जीवनदान मिळाले आहे. बळीराजा सुखावला आहे.

हेही वाचा…एक घोडा, दो दुल्हे निकल गये’ कोडवर्डचा वापर अन्…

नवापूर शहरातील इस्लामपुरा भागात पाणी तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे गुडघ्याएवढ्या पाण्यात नागरिकांना मार्गस्थ होण्याची वेळ आली.