नाशिक : नंदुरबार येथील एका शिक्षकाला मोहजाळात अडकवून अश्लिल चित्रफित तयार करण्यात आली. नंतर चित्रफित समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देत शिक्षकाकडे १२ लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या चौघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नंदुरबार येथील एका शिक्षकाची धुळ्यातील देवपूर भागात असलेल्या एका मुलीशी महिनाभरापूर्वी समाज माध्यमाव्दारे ओळख झाली. ११ जानेवारी रोजी संबंधित मुलीने शिक्षकाला धुळे येथे भेटण्यासाठी बोलविले. १२ जानेवारीला शिक्षक तिला भेटण्यासाठी जी.टी.पी. स्टॉप या ठिकाणी गेला. संबंधित मुलगी दुचाकीवर त्यांना घेण्यासाठी आली. तिने शिक्षकाला तिच्या घरी नेले. तेवढ्यात तिथे तीन जण आले. त्यांनी शिक्षकाचे कपडे काढून संबंधित महिलेबरोबर चित्रफित तयार केली. चित्रफित समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची मागणी केली. तिघांनी शिक्षकाकडील भ्रमणध्वनीही हिसकावून घेतला. या घटनेनंतर सायंकाळी शिक्षक नंदुरबार येथे निघून गेले. १३ जानेवारी रोजी त्यांनी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत धाव घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तपास पथक तयार करुन नंदुरबार येथे धुळे चौफुलीवर सापळा रचला. तेथे एका मोटारीतून चार जण आले. ठरल्याप्रमाणे शिक्षकाने त्यांच्याकडे खंडणीची रक्कम देताच संशयितांना धुळे व नंदुरबार पोलिसांच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले.

हेही वाचा…नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास

देवेश कपूर (१९), हितेश बिऱ्हाडे (१९, रा. तिरुपती नगर, बिलाडीरोड, देवपूर, धुळे), हर्षल वाघ (२१, रा.भगवा चौक, रावेर, धुळे) आणि विनय नेरकर (२३,रा. फॉरेस्ट कॉलनी, देवपूर, धुळे) यांचेविरुध्द देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार मायुस सोनवणे, संदीप पाटील, पंकज खैरमोडे, हवालदार चेतन बोरसे, संजय सुरसे यांनी केली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nandurbar teacher was extorted rs 12 lakh after being trapped in pornographic film sud 02