लोकसत्ता प्रतिनिधी
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी या तीर्थयात्रा करीत असून शनिवारी येथे त्यांनी ओंकारेश्वर मंदिरात अभिषेक, पूजा-अर्चा केली.
जशोदाबेन जळगावमार्गे पुरी येथे जात असताना सुमारे दोन तास जळगावात थांबल्या. त्यांच्यासमवेत बहीण, भाऊ, सेवकांसह दोन सुरक्षारक्षक, पोलिसांचा ताफा होता. ओंकारेश्वर मंदिरात त्यांनी अभिषेक करीत समुद्र जल, नर्मदा जल, गंगाजलासह पुष्पबेल अर्पण केले. त्यांनी देशाच्या समृद्धीसाठी अभिषक संकल्प करीत आरती केली. मंदिर संस्थानतर्फे जशोदाबेन यांचा जुगलकिशोर जोशी, आशा जोशी यांनी सत्कार केला.
First published on: 24-06-2023 at 20:20 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modis wife jashodaben worship at omkareshwar temple in jalgaon mrj