मालेगाव : येथील गिरणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या १५ जणांची तब्बल १९ तासानंतर लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. मोठ्या प्रतिक्षेनंतर या सर्वांची सुटका करण्यात यश आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

मालेगाव आणि धुळे येथील रहिवासी असलेले एकूण १५ जण रविवारी दुपारी हौस म्हणून शहराजवळील सवंदगाव शिवारातील नदीपात्रात मासेमारीसाठी गेले होते. नदीपात्रातील एका टेकडीवर उभे राहून हे लोक मासेमारी करत असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक पुराचे पाणी व प्रवाह वाढला. त्यामुळे ही टेकडी पुराच्या पाण्याने वेढली गेल्याने हे सर्वजण तेथे अडकून पडले. या संदर्भात माहिती मिळाल्यावर मालेगाव महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख डॉ. संजय पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. परंतु, पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे नदीपात्रातील या टेकडीपर्यंत मदतकार्य पोहोचविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मर्यादा आल्या. त्यामुळे रात्री धुळे येथून आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकास पाचारण करण्यात आले. परंतु, अंधार व पाण्याची खोली, मोठा प्रवाह यामुळे बचावकार्य करता आले नाही. त्यामुळे रात्रभर हे सर्वजण अन्नपाण्यावाचून टेकडीवरच अडकून पडले.

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी
Magnav taluka , Four people drowned, Kundalika river,
रायगड : कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू

हेही वाचा – नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला….; जायकवाडीला साडेदहा टीएमसी पाणी

पूर पाण्याच्या पातळीपासून ही टेकडी जवळपास १० फूट उंच असल्याने अडकलेले लोक धोक्याबाहेर होते. चणकापूर व पुनद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे ठेंगोडे बंधाऱ्यातून गिरणा नदीपात्रात जवळपास २० हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. हरणबारी धरण पूर्ण भरल्याने मोसम नदीलाही पूर येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत गिरणा, मोसम संगमाच्या खाली असलेल्या या टेकडीवर पाणी गेल्यास अडकलेल्या लोकांचे काय, अशा भीतीमुळे सर्वजण काळजीत होते. अडकलेल्या लोकांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष वाढत असल्याने प्रशासनावरही दबाब वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

हेही वाचा – नंदुरबार : अल्याड गाव, पल्याड स्मशान अन मध्येच नदी, मृतदेह स्मशानात नेणार कसा ?

दोरखंड वा होडीच्या सहाय्याने बचाव कार्य शक्य नसल्याने या लोकांची सुटका हेलिकॉप्टरच्या सहाय्याने करण्याचे प्रशासनाने ठरविले. त्यानुसार सोमवारी गांधीनगर येथील लष्करी हवाई दलाच्या प्रशिक्षण संस्थेशी (कॅट्स) संपर्क साधण्यात आला. दलाचे वैमानिक ध्रुव हेलिकॉप्टर घेऊन घटनास्थळी पोहोचले. एका वेळी पाच जण याप्रमाणे तीन फेऱ्या मारुन हेलिकॉप्टरद्वारे दुपारी १२ वाजता या सर्वांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर त्यांना सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

Story img Loader