नाशिक : येथील भारत प्रतिभृती मुद्रणालय (आयएसपी) आणि चलार्थपत्र मुद्रणालयातील (सीएनपी) कामगारांना या वर्षी १६ हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक बोनस असल्याचे सांगितले जाते. साधारणत: ११ वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ पर्यंत कामगारांना २,४६७ रुपये बोनस मिळत होता. त्या काळात सत्ता परिवर्तन झाले. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी प्रशासनाशी चर्चा केल्याने बोनसमध्ये १० हजारापर्यंत वाढ झाली. होशंगाबाद, पंचमढी (मध्यप्रदेश) येथे देशभरातील मुद्रणालयाचे कामगार नेते आणि व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : गोदावरीची सद्यस्थिती अतिदक्षता घेण्यासारखी, अवैध उत्खनन रोखण्यासाठी ब्रह्मगिरीचे सीमांकन गरजेचे – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

नाशिक रोड प्रेस मजदूर संघाच्या नेत्यांनी बोनसमध्ये वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर याप्रश्नी नवी दिल्लीत प्रेस व्यवस्थापनासमवेत विशेष बैठक होऊन बोनसमध्ये वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. प्रेस महामंडळाचे संयुक्त महाव्यवस्थापक (मनुष्यबळ विकास) प्रकाशकुमार यांनी १६ हजारांचा बोनस देण्याचे परिपत्रक काढले आहे. नाशिकरोड मुद्रणालयासह देशभरातील मुद्रणालयातील कामगारांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होईल, अशी माहिती जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik 16 thousand rupees diwali bonus to isp and cnp printing workers css