नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.. बाळ अदलाबदल, पाच दिवसांचे बाळ चोरीस जाणे, यासारख्या घटनांमुळे रुग्णालयाच्या प्रतिमेवर परिणाम होत असताना रविवारी दुपारी २५ वर्षाच्या महिलेने रुग्णालयाच्या आवारातील झाडाला ओढणीने गळफास घेतला.

रविवारी सुट्टी असल्याने जिल्हा रुग्णालयात नेहमीपेक्षा वर्दळ कमी होती. दुपारी दोन वाजता आरोग्य अभियानाच्या कार्यालयासमोरील एका झाडाला महिलेने गळफास घेतल्याचे समजल्यानंतर सुरक्षारक्षक, परिचारिका, डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीतील पोलिसांनी सरकारवाडा पोलिसांना याविषयी माहिती दिली. कविता अहिवळे (२५, रा. संत कबीर नगर, नाशिक) असे या महिलेचे नाव आहे. मृत महिलेला चार मुली आहेत.

हेही वाचा…सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ, राज्यातील पावणेदोन लाखहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित

ती भंगार गोळा करण्याचे काम करते. तिची तिसरी मुलगी अशक्तपणामुळे आजारी असल्याने तिला जिल्हा रुग्णालयातील कुपोषित विभागात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी कविता ही मुलीला घेऊन बाहेर गेली होती. ती दुपारी गळफास घेतलेल्या अवस्थेत रुग्णालयाच्या आवारात आढळून आली. पोलिसांनी या प्रकाराची नोंद केली आहे.

Story img Loader