नाशिक : श्रावणातील तिसऱ्या सोमवारला विशेष महत्व असल्याने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा करणाऱ्यांची गर्दीत भर पडणार असल्याने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून २५० जादा बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा अधिकचा श्रावण आल्याने उत्तर भारतीयांसह देशाच्या इतर भागातून आलेल्या भाविकांनी अधिक मासात शिवदर्शनाला प्राधान्य दिले.

गोदाकाठासह बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर, कुशावर्त परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी ही गर्दी उच्चांक गाठेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला विशेष महत्व आहे. प्रदक्षिणा करणाऱ्यांमध्ये भाविकांसह निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचाही सहभाग असतो. काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने ब्रम्हगिरीवरुन कोसळणारे धबधबेही आता बंद झाले आहेत. जुलैमध्ये या परिसरात चांगला पाऊस झाल्याने परिसर हिरवाईने नटलेला असल्याने पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Best bus accident Kurla, BJP demands inquiry Best bus,
बेस्ट बस अपघात : राजकारण तापले, चौकशीची भाजपची मागणी, भाडेतत्वावरील बस गाड्यांवरून आदित्य ठाकरे लक्ष्य
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!

हेही वाचा : मुख्यमंत्री नऊ सप्टेंबरला पाचोऱ्यात, शासन आपल्या दारी तालुका उपक्रम

ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करताना भाविकांसह पर्यटकांना निसर्गात फेरफटका मारण्याची एक वेगळीच अनुभूती मिळते. प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी स्थानिक चहा, उपवासाचे पदार्थ यांची विक्री करीत असल्याने त्यांना या दिवसात काही प्रमाणात रोजगार मिळतो. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने भाविकांची होणारी गर्दी पाहता गर्भगृहातील दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना दुरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. व्ही.आय.पी. दर्शनही बंद ठेवण्यात आले असून रांगेतील भाविकांसाठी लाडू, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांकडून जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावर धुडगूस घालणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा : धुळ्यात दूध भेसळ करणाऱ्या आठ विक्रेत्यांवर कारवाई

नगरपालिका प्रशासनाकडून या काळात भाविकांची होणारी गर्दी पाहता फिरते शौचालय, पाणी, आरोग्य पथक आदींची व्यवस्था करण्यात येत असून खासगी वाहनांना त्र्यंबक शहर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मागील दोन सोमवारचा अनुभव लक्षात घेता तिसऱ्या श्रावणी सोमवारी होणाऱ्या गर्दीकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरजवळील विविध भागातून त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची ने-आण करण्यासाठी २५० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. तीन आणि चार सप्टेंबर रोजी या जादा बस आपली सेवा देणार आहेत. यामध्ये नाशिक ते त्र्यंबक १८०, अंबोली ते त्र्यंबक १०, पहिने ते त्र्यंबक १०, घोटी ते त्र्यंबक १० आणि खंबाळे ते त्र्यंबक ४० अशा २५० बसचे नियोजन करण्यात आले आहे.

Story img Loader