नाशिक : श्रावणातील तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या पार्श्वभूमीवर, भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारातून २७० जादा बससेवेची व्यवस्था त्र्यंबकेश्वरसाठी करण्यात आली आहे.
श्रावणात बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी आठपासून १९ ऑगस्टपर्यंत वाहनतळ आणि नाशिक येथील नवीन सीबीएसपासून जादा बस निघतील. नाशिक ते त्र्यंबकसाठी १९०, अंबोली ते त्र्यंबकसाठी एक, पहिने ते त्र्यंबकसाठी १०, घोटी ते त्र्यंबकसाठी १०, खंबाळे ते त्र्यंबकसाठी ५० अशा २७० बसच्या माध्यमातून फेऱ्या सुरू राहणार आहेत.
हेही वाचा…कोणतीच बहीण लाडकी नसल्याचा अधिक अनुभव! सुप्रिया सुळे यांच्याकडून अजित पवार लक्ष्य
खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश बंद
दरम्यान, जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या वतीने त्र्यंबकेश्वर परिसरात वाहनांची गर्दी होऊ नये, यासाठी खंबाळे परिसरापासून खासगी वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. भाविकांनी राज्य परिवहनच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय सर्वतीर्थ टाकेद आणि