महानगरपालिकेकडून सफाई कामगार, मानधनावरील कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक आदी कर्मचाऱ्यांच्या सेवा कंत्राटदार, महामंडळामार्फेत घेतल्या जातात. अशा सर्व कंत्राटदारांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांचे वेतन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजेच थेट बँकेत जमा केले पाहिजे, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.
हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या
ठेकेदारांकडून कामगारांना कमी वेतन दिले जात असल्याच्या तक्रारी होत्या. पालकमंत्री दादा भुसे यांनी अलीकडेच घेतलेल्या आढावा बैठकीत यावर चर्चा झाली होती. त्यांनी कामगारांना वेतन बँक खात्यात जमा करण्याचे सूचित केले होते. मनपातील अनेक खात्यात कंत्राटी कामगारांची संख्या मोठी आहे. विभागप्रमुखांच्या बैठकीत या बाबतची सूचना आयुक्तांनी आधीच केली होती. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश डॉ. पुलकुंडवार यांनी दिले.
चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी कामगारांचे वेतन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजेच बँकेत जमा होते आहे का, याची खात्री करावी. अशा पद्धतीने वेतन दिले जात नसेल तर तत्काळ संबंधित सेवा पुरवठादार, कंत्राटदार यांच्या विरुद्ध कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कामगार, कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन अचूक आणि योग्य मिळावे, कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, हा यामागचा उद्देश असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी म्हटले आहे.