लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरीजवळील टाकळी (शिंपी) फाटा येथे नाशिक-छत्रपती संभाजी नगर राज्यमार्गावर रविवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास शिवशाही बसने पेट घेतला. बसमधील सर्व ३५ प्रवासी सुखरूप आहेत.

आणखी वाचा-सत्यशोधक मोर्चाची नंदुरबारहून धुळ्याकडे कूच, २३ डिसेंबरला मुंबईत धडक

शिवशाही बस नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना धावत्या बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले, चालकाने तत्काळ बस थांबून सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान सागर गडाख, सोमनाथ कोटमे, भाऊ कर्डिले, किरण वाघ, सूरज पगारे, सचिन कांबळे, नीलेश नाठे, गोकुळ टर्ले यांनी सहकार्य केले. स्थानिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे कारण समजू शकले नाही.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik chhatrapati sambhajinagar shivshahi burn near chandori all passengers safe mrj
Show comments