नाशिक – सिन्नर तालुक्यातील बेंदमळा भागात गुरुवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. घराच्या ओट्यावर तो गेला असता पाठ वळताच बिबट्याने झडप घालून त्याला शेतात खेचून नेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रफुल्ल तांबे असे या मुलाचे नाव आहे. समृद्धी महामार्गालगतच्या गोंदे येथील बेंदमळा भागातील तांबे वस्तीत ही घटना घडली. रात्री नऊच्या सुमारास प्रफुल्ल हा वडिलांबरोबर लघुशंकेसाठी घराबाहेर आला होता. त्यानंतर घरात जात असताना बिबट्याने त्याला ओट्यावरून क्षणार्धात उचलून मक्याच्या शेतात नेले. वडील रवींद्र तांबे यांनी आरडाओरड केली. घरातील लोक बाहेर आले. वस्तीवरील नागरिकांनी धाव घेतली. सर्वांनी लाठ्या-काठ्या घेऊन शोध घेतला. एका ठिकाणी प्रफुल्ल गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याला तातडीने सिन्नर येथे नेण्यात आले. परंतु, त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

हेही वाचा – नाशिक : मूलभूत सुविधांअभावी मृत्यूनंतरही यातना

हेही वाचा – गोदावरी खोऱ्यातील नेत्यांचा नार-पारचे पाणी पळविण्याचा प्रयत्न – गिरणा धरणावरील मेळाव्यात आरोप

या घटनेनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर बिबट्याचा शोध घेतला. परंतु, तो मिळून आला नाही. काही दिवसांपूर्वी तांबे कुटुंबियांच्या कुत्र्याचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik child died in leopard attack ssb