नाशिक – आठवडाभरापासून थंडीची लाट अनुभवणाऱ्या नाशिकमध्ये मंगळवारी पारा आठ अंश या हंगामातील नीचांकी पातळीपर्यंत खाली घसरला. मागील सहा वर्षातील डिसेंबरमधील हे सर्वात कमी तापमान आहे. २०१८ मध्ये या महिन्यात पारा ५.१ अंशावर आला होता. कमालीच्या गारठ्याने साखर उतरलेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती आहे.

हंगामातील थंडीची ही दुसरी लाट आहे. यापूर्वी नोव्हेंबरच्या अखेरीस काही दिवस थंडीने मुक्काम ठोकला होता. तेव्हा ३० तारखेला तापमानाने ८.९ अंश ही नीचांकी पातळी गाठली. नंतर ढगाळ वातावरणात आणि अवकाळी पावसात काही दिवस थंडी अंतर्धान पावली. मागील आठवड्यात तिचे जोरदार पुनरागमन झाले. १० ते १६ डिसेंबर या कालावधीत पारा ११.९ ते ९.४ अंशादरम्यान होता. आदल्या दिवशीच्या तुलनेत यात १.४ अंशानी घट होऊन मंगळवारी तो आठ अंशावर आल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. या हंगामातील हे नीचांकी तापमान आहे. निफाडच्या कृषी विज्ञान केंद्रात ५.७ अंशाची नोंद झाली. कमालीच्या गारठ्याने सर्वत्र हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात अधिक गारठा असून पहाटे धुक्याची दुलई पसरते. दिवसभर वातावरणात गारठा असतो. बचावासाठी उबदार कपडे परिधान करावे लागत आहेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटत असून सकाळी व्यायामासाठी गर्दी होत आहे.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Nashik, Kumbh Mela , meeting ,
नाशिक : कुंभमेळा तयारीसाठी लवकरच स्थानिक पातळीवर बैठक, संशयास्पद भूसंपादनाची चौकशी
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
nashik hotel gun on servant
नाशिक : हॉटेलमधील नोकरावर बंदूक रोखणाऱ्या पोलिसाचे निलंबन ?
Redesign of Pune-Nashik railway line
‘जीएमआरटी’चे स्थलांतर नाही… पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची नव्याने आखणी
sunlight
हिवाळ्यात एक-दोन आठवडे आणि एक महिना सूर्यप्रकाशापासून दूर राहिल्यास काय होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा…

हेही वाचा – चोरीच्या दुचाकींची रंग बदलून विक्री, दोन संशयित ताब्यात

u

उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडत आहे. एरवी डिसेंबर, जानेवारीत कडाक्याची थंडी असते. याच काळात तापमान नीचांकी पातळी गाठते. यंदा नोव्हेंबरच्या मध्यानंतर थंडीला सुरुवात झाल्यामुले चालू हंगामात अधिक काळ गारव्याची अनुभूती मिळणार आहे. कमालीच्या गारठ्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे.

आरोग्याच्या समस्या

बदलत्या वातावरणात सर्दी, खोकल्यासह थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांना वातावरण बदलाचा सर्वाधिक त्रास होत आहे. विषाणू संसर्गाने सर्दी- खोकल्यासह, थंडी-तापाचे रुग्णात वाढ झाली. तर अनेकांना अंगात कणकण, हातपाय दुखणे आदी त्रास जाणवत आहे.

सहा वर्षातील डिसेंबरमधील नोंदी

हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार मागील सहा वर्षात डिसेंबरमधील आठ अंश हे सर्वात कमी तापमान आहे. २०१८ मध्ये २१ डिसेंबरला नाशिकचे तापमान ५.१ या नीचांकी पातळीवर आले होते. हा अपवाद वगळता पुढील काळात तापमान तितके खाली गेले नव्हते. २०१९ या वर्षात २८ डिसेंबरला ११.४ अंश, २३ डिसेंबर २०२० रोजी ८.२ अंश, २१ डिसेंबर २०२१ रोजी १०.८ अंश, २०२२ मधील डिसेंबरमध्ये ९.८ आणि गतवर्षी म्हणजे १६ डिसेंबर २०२३ या तारखेला १२.५ अंश या डिसेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. चालू वर्षाचा विचार करता सहा वर्षातील यंदा हे कमी तापमान ठरले.

हेही वाचा – रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात मोहीम मेनरोड, शालिमार भागात कारवाई

द्राक्षांसाठी नुकसानकारक

घटते तापमान तयार झालेल्या आणि होण्याच्या स्थितीत असणाऱ्या द्राक्षांसाठी नुकसानकारक आहे. अवकाळी पावसाने आधीच द्राक्षबागांचे नुकसान झाले होते. दव आणि धुक्यामुळे त्यात आणखी भर पडली. साखर उतरलेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्यास तीव्र थंडी कारक ठरते, असे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी सांगितले. बागलाणसह अन्य भागात हंगामपूर्व द्राक्षबागा तयार आहेत. तिथे अशा संकटाला तोंड द्यावे लागू शकते. इतर भागातील द्राक्षबागा वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. जमिनीचे तापमान कमी झाल्यास द्राक्षवेलींचा विकास थांबतो. परिणामी फुलोरा प्रक्रिया उशिराने होईल. तापमानातील हे तीव्र बदल निर्यातक्षम द्राक्ष तयार होण्यात अडसर ठरतात, असेही गडाख यांनी स्पष्ट केले.

Story img Loader