नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात एकूण १९६ उमेदवार रिंगणात असून मालेगाव बाह्य, बागलाण आणि इगतपुरी मतदारसंघात प्रत्येकी १७ उमेदवार रिंगणात असल्याने या ठिकाणी दोन मतदान यंत्रे लागणार आहेत. उर्वरित १२ मतदारसंघात एकाच मतदान यंत्राची गरज पडणार आहे. जादा मतदान यंत्र लागणाऱ्या मतदारसंघांसाठी सरमिसळ करून ही यंत्रे पुरविली जात आहेत.

जिल्ह्यात सर्वात जास्त प्रत्येकी १७ उमेदवार मालेगाव बाह्य, बागलाण आणि इगतपुरी मतदारसंघात आहेत. सर्वात कमी म्हणजे सात उमेदवार कळवण आणि त्यानंतर नऊ उमेदवार निफाड मतदारसंघात आहेत. मतदान यंत्रावर म्हणजे एका बॅलेट युनिटवर एकूण १६ उमेदवारांची नावे समाविष्ट होतील, अशी रचना असते. त्यानुसार मतपत्रिका तयार केली जाते. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनंतर मतपत्रिकेवर वरीलपैकी कोणीही नाही (नोटा) हे चिन्ह असते. ज्या ठिकाणी १५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तिथे १५ उमेदवार आणि १६ व्या क्रमांकावर नोटा अशी मतपत्रिकेची रचना असते. अशी स्थिती जिल्ह्यात केवळ नाशिक पश्चिम मतदारसंघात आहे.

Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज

हेही वाचा…शहरासह ग्रामीण भागात प्रचाराच्या वेगळ्या तऱ्हा

u

मालेगाव बाह्य, इगतपुरी आणि बागलाण या मतदारसंघात प्रत्येकी एकूण १७ उमेदवार आणि एक नोटा अशी रचना करावी लागणार असल्याने दोन मतदान यंत्र लागणार आहेत. जिल्ह्यात ४९२२ मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्रांच्या संख्येनुसार १०८८२ बीयू, ६२४७ सीयू आणि ६७३९ व्हीव्ही पॅट प्रथमस्तरीय तपासणी करून मतदानासाठी तयार करण्यात आले आहेत. प्रथम सरमिसळ करून ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. ही यंत्रे विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी निर्मिलेल्या विशेष सुरक्षा कक्षात बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा…देवळालीत नेमका कोणाचा प्रचार करावा? शिंदे गटासमोर संभ्रम

जिल्ह्यात पुरेशी मतदान यंत्रे

ज्या मतदारसंघात दोन मतदान यंत्रांची आवश्यकता आहे, तिथे मंगळवारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निरीक्षकांच्या उपस्थितीत पुरवणी सरमिसळ करून मतदान यंत्रे पुरविली जात आहेत. जिल्ह्यात सर्व मतदारसंघात आवश्यक संख्येइतकी मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. डॉ. शशिकांत मंगरुळे (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक)

Story img Loader