नाशिक: किमान सेवानिवृत्ती वेतन नऊ हजार रुपये असावे, इपीएफ निवृत्तीवेतन प्रश्नावर श्वेतपत्रिका जाहीर करावी, यासह इतर मागण्यांसाठी गुरूवारी नाशिक जिल्हा इपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
देशात ७५ लाखांपेक्षा अधिक इपीएस निवृत्तधारकांचा सेवानिवृत्ती वेतनाचा प्रश्न गंभीर आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे २० लाखांहून अधिक सेवानिवृत्ती वेतन धारकांना एक हजार किंवा त्यापेक्षा कमी सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे.
हेही वाचा… नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी; कोकण, केरळलाही पसंती
याची दखल घेऊन राष्ट्रपतींनी इपीएफ निवृत्तांना न्याय मिळवून द्यावा, सेवानिवृत्ती वेतनला महागाईपासून संरक्षण देणारा महागाई भत्ता असावा, सर्व सेवानिवृत्ती वेतनधारकांना तसेच त्यांच्या कुटूंबियांना स्वस्त दरात स्वस्त धान्य, संपूर्ण मोफत वैद्यकीय सुविधा, प्रवासात सवलत द्यावी, पेन्शन निधी शेअर बाजारात गुंतवणे बंद करा, आधी केलेल्या गुंतवणुकीला संपूर्ण हमी द्या, सर्व विभागीय कार्यालयात पुरेसे कर्मचारी नेमा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबत राष्ट्रपतींसाठी निवेदन देण्यात आले आहे.