नाशिक : जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची २०१८-१९ पासून अडकलेली फरक देयके त्वरित मिळावीत, प्रारंभी ६१६ आणि त्यानंतर ८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देयके ३१ मार्चपूर्वी मिळावीत, अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने वेतन पथक अधीक्षकांकडे केली आहे. देयके काढण्याच्या संदर्भात कोणतीही प्रतिक्षा यादी नाही. त्यामुळे २०२३ ची देयके निघाली असताना २०१८ ची देयके न निघणे हा अन्याय असून मोठ्या प्रमाणात दलालांकडून आर्थिक मागणी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या असल्याचेही नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथक अधीक्षक नितीन पाटील यांच्या लक्षात आणून दिले. संघाचे सचिव एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, मोहन चकोर, छोटु शिरसाठ, उमेश कांडेकर, डॉ. अनिल माळी, तुकाराम घुले, एम. डी. काळे यांनी मागण्यांचे निवेदन वेतन अधीक्षकांना दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा