लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: नाशिक जिल्हा प्रगतिशील साहित्य संमेलन आठ ऑक्टोबर रोजी येथील व्ही. एन. नाईक समाज संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनास अध्यक्ष म्हणून तुकाराम चौधरी तर स्वागताध्यक्ष म्हणून राजू देसले यांची निवड झाली आहे.

Vanchit Bahujan aghadi agitation against senior literary figure in Nagpur
नागपुरातील ज्येष्ठ साहित्यिकाच्या विरोधात वंचितचे आंदोलन, निवासस्थानी पोलीस तैनात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
There is no alternative to Ajit Pawar for the next 25 years says Nitin Patil
आगामी २५ वर्षे अजित पवारांना पर्याय नाही – नितीन पाटील
Raj Thackeray, emblem, Marathi Sahitya Samelan,
साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरे यांच्याकडून होणार निवड
Sharad Pawar offer prayers at Lalbaugcha Raja
Sharad Pawar at Lalbaugcha Raja: शरद पवारांच्या श्रद्धेवर भाजपाकडून प्रश्नचिन्ह का? पवारांचे लालबागच्या राजाचे दर्शन वादात का?
maharashtra sahitya parishad marathi news
प्रा. डॉ. सदानंद मोरे थेटच बोलले, “साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठीचे टोळीयुद्ध…”
Sunil Gavaskar Statement on Jay Shah ICC President Post
Sunil Gavaskar on Jay Shah: ‘जय शाह ICC चे अध्यक्ष झाले तर भारतीय क्रिकेट…” सुनील गावसकरांचे शाह यांच्या अध्यक्षपदाच्या चर्चांवर मोठे वक्तव्य
congress member of parliament vasant chavan was seventh representative in nanded district who died on duty
नांदेडमध्ये पदावर असताना मृत्यू पावलेले सातवे लोकप्रतिनिधी !

संमेलनस्थळाला बाबुराव बागूल साहित्यनगरी हे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार विजेते तारपा वादक भिकल्या धिंडा यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, वित्त व लेखाचे सहसंचालक माधव थैल, साहित्यिक संजय दोबाडे, कचरू भालेराव उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा… नाशिक: वीज मोटारीचा धक्का लागल्याने बालकाचा मृत्यू

उद्घाटन तसेच सन्मान सोहळा ९.३० ते १२.०० या वेळेत होणार आहे. १२.०० ते १.०० पहिला परिसंवाद आणि २.०० ते ३.०० या वेळेत दुसरा परिसंवाद होणार आहे. प्रगतिशील साहित्य व साहित्यिकांची लक्षणे या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विवेक खरे असून प्रा. डॉ. फारुख शेख, अमोल बागूल, लता कांबळे हे विचार मांडतील. भारतीय संविधान व आजची परिस्थिती या परिसंवादाचे अध्यक्ष करुणासागर पगारे असून प्रा. डॉ. पी. डी .देवरे, किरण मोहिते, नाझिमुद्दीन काजी हे विचार मांडतील. ३.०० ते ५.३० या वेळेत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा… नाशिकमध्ये आदिवासी विकासमंत्र्यांना घेराव; महामंडळाच्या सभेत गोंधळ

ख्वाडा, बबन, टीडीएम अशा चित्रपटांची गाणी लिहिणारे गीतकार आणि प्रसिद्ध कवी विनायक पवार यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. कवी संमेलनाचे सत्र समन्वयक कवी अरुण घोडेराव राहतील. सर्व साहित्यिक मित्रांनी या वैचारिक जागरास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रगतिशील साहित्य संमेलनाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे, सचिव प्रल्हाद पवार यांनी केले आहे.