लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: नाशिक जिल्हा प्रगतिशील साहित्य संमेलन आठ ऑक्टोबर रोजी येथील व्ही. एन. नाईक समाज संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनास अध्यक्ष म्हणून तुकाराम चौधरी तर स्वागताध्यक्ष म्हणून राजू देसले यांची निवड झाली आहे.

संमेलनस्थळाला बाबुराव बागूल साहित्यनगरी हे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार विजेते तारपा वादक भिकल्या धिंडा यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, वित्त व लेखाचे सहसंचालक माधव थैल, साहित्यिक संजय दोबाडे, कचरू भालेराव उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा… नाशिक: वीज मोटारीचा धक्का लागल्याने बालकाचा मृत्यू

उद्घाटन तसेच सन्मान सोहळा ९.३० ते १२.०० या वेळेत होणार आहे. १२.०० ते १.०० पहिला परिसंवाद आणि २.०० ते ३.०० या वेळेत दुसरा परिसंवाद होणार आहे. प्रगतिशील साहित्य व साहित्यिकांची लक्षणे या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विवेक खरे असून प्रा. डॉ. फारुख शेख, अमोल बागूल, लता कांबळे हे विचार मांडतील. भारतीय संविधान व आजची परिस्थिती या परिसंवादाचे अध्यक्ष करुणासागर पगारे असून प्रा. डॉ. पी. डी .देवरे, किरण मोहिते, नाझिमुद्दीन काजी हे विचार मांडतील. ३.०० ते ५.३० या वेळेत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा… नाशिकमध्ये आदिवासी विकासमंत्र्यांना घेराव; महामंडळाच्या सभेत गोंधळ

ख्वाडा, बबन, टीडीएम अशा चित्रपटांची गाणी लिहिणारे गीतकार आणि प्रसिद्ध कवी विनायक पवार यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. कवी संमेलनाचे सत्र समन्वयक कवी अरुण घोडेराव राहतील. सर्व साहित्यिक मित्रांनी या वैचारिक जागरास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रगतिशील साहित्य संमेलनाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे, सचिव प्रल्हाद पवार यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik district progressive literature conference has been organized dvr
Show comments