ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील ४० पोलीस ठाणे अंतर्गत सरत्या वर्षाच्या शेवटच्या रात्री मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या १३४ जणांकडून ७९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अवैधरित्या मद्याची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या ५३ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नाशिक जिल्ह्यात पोलिओची लसीकरणाची अतिरिक्त मात्रा देण्यास सुरुवात

मद्यपान करुन वाहन चालविल्याने होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून मोहीम आखण्यात आली. त्याअंतर्गत जिल्ह्यातील महामार्ग, वर्दळीची ठिकाणे, तपासणी नाका आदी ठिकाणी अडथळे उभारून नाकाबंदी करण्यात आली. मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांच्या तपासणीसाठी ब्रिथ ॲनालयझर यंत्राचा वापर करण्यात आला. हॉटेल, ढाबे, रिसोर्ट या ठिकाणांजवळ वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सुरक्षात्मक योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. याशिवाय महामार्ग आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने गस्तीवर भर देण्यात आला. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे, रिसोर्ट, हॉटेल, ढाबे, मॉल या परिसरात साध्या वेशातील पोलिसांनी करडी नजर ठेवली. यासाठी दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, जिल्हा वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय स्तरावरील पथके, विशेष पथके, साध्या वेशातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या १३४ जणांकडून ७९ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा- नाशिक: बालकाचा जीव घेणारा बिबट्या अखेर जेरबंद

सरत्या वर्षाचा शेवट आणि नववर्षाचे स्वागत या कालावधीत अवैधरित्या मद्याची विक्री आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ती रोखण्याकडेही पोलिसांकडून विशेष लक्ष देण्यात आले. त्याअंतर्गत ५३ जणांविरुध्द कारवाई करण्यात येऊन सात लाख, ८४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार खेळविण्यात येणाऱ्या सात अड्ड्यांवरही कारवाई करण्यात आली. रोख रकमेसह १४,०१,७१५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तसेच मारहाणीसह इतर गुन्हे करणाऱ्या १८ जणांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत असून असे काही व्यवसाय सुरु असल्यास आणि त्याविषयी नागरिकांना काही माहिती द्यावयाची असल्यास नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या ६२६२२५६३६३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik district rural police collected a fine of 79 thousand rupees against 134 drunk drivers dpj