नाशिक : जिल्ह्यात ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांपेक्षा सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान बागलाणचे दिलीप बोरसे यांनी मिळवला असताना दुसरीकडे सर्वात कमी १६२ मतांनी मालेगाव मध्यमधून एमआयएमचे मुफ्ती मोहमंद इस्माईल हे निवडून आले. जिल्ह्यातील १५ जागांवर सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या १५ आमदारांच्या मताधिक्याचा आलेख चढता-उतरता राहिल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीचा विचार करता कोणाचे दुप्पट तर कोणाचे सातपट मताधिक्य वाढले तर काहींचे कमीही झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत एकहाती वर्चस्व राखत महायुतीने १४ जागांवर विजय मिळवला. मालेगाव मध्य मतदार संघात महायुतीने उमेदवार दिला नव्हता. जिल्ह्यातील अनेक जागांवर विजयी उमेदवारांना मिळालेल्या विक्रमी मताधिक्याने विरोधक स्पर्धेतही आले नाहीत. जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम बागलाणमधील भाजपचे दिलीप बोरसे यांनी नोंदवला. त्यांनी १ लाख २९ हजारहून अधिक मतांच्या फरकाने राष्ट्रवादीच्या (शरद पवार) दीपिका चव्हाण यांना पराभूत केले. तर मालेगाव मध्यचे एमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी अवघ्या १६२ मतांनी इस्लाम पार्टीच्या असिफ शेख रशिद यांना पराभूत केले.
हेही वाचा : नाशिक : फवारणीवेळी औषध नाकात गेल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू
एक लाखहून अधिकच्या मताधिक्याने विजयी होणाऱ्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे, चांदवडमधील भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांचा समावेश आहे. भुसे यांनी एक लाख सहा हजारहून अधिकच्या मताधिक्याने प्रतिस्पर्ध्यावर मात केली. तर डॉ. आहेर यांनी एक लाख चार हजारहून अधिकच्या फरकाने विजय मिळवला.
नाशिक शहरात नाशिक पूर्वचे भाजपचे ॲड. राहुल ढिकले यांनी ८७ हजारहून अधिकचे मताधिक्य मिळवले. मागील निवडणुकीत ते सुमारे १२ हजाराच्या फरकाने विजयी झाले होते. यंदा त्यांच्या मताधिक्यात सातपट वाढ नोंदविली गेली. तशीच कामगिरी नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरे यांनी नोंदविली. त्यांनी ६८ हजारहून अधिकच्या फरकाने शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) सुधाकर बडगुजर यांना पराभूत केले. गतवेळच्या तुलनेत त्यांना मिळालेल्या एकूण मतांमध्ये ७० हजारांनी वाढ झाली आहे. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे यांनी १७ हजारच्या मताधिक्याने विजय मिळवला. मागील वेळच्या तुलनेत त्यांचे मताधिक्य घटले.
हेही वाचा : नाशिक : जमिनीच्या वादातून साल्हेर किल्ल्यावर दुहेरी हत्याकांड
इगतपुरीत अजित पवार गटाचे हिरामण खोसकर यांनी ८६ हजार तर, दिंडोरीत नरहरी झिरवळ यांनी ४४ हजारहून अधिकचे मताधिक्य मिळवले. सिन्नरमधून या पक्षाचे माणिकराव कोकाटे आणि देवळालीत सरोज अहिरे यांनी प्रत्येकी ४० हजार, निफाडमधून दिलीप बनकरांनी प्रतिस्पर्ध्यावर २९ हजारहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. कळवण मतदारसंघात याच पक्षाचे नितीन पवार हे सर्वात कमी म्हणजे ८४३२ मतांनी निवडून आले. नांदगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदेंनी ८९ हजार ८७४ मतांच्या फरकाने विजय मिळवला. २०१९ च्या तुलनेत त्यांच्या मताधिक्यात सुमारे साडेपाचपट वाढ झाली आहे.
हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात केवळ १६ उमेदवारांना अनामत वाचविणे शक्य
छगन भुजबळ यांच्या मताधिक्यात घट
सलग पाचव्यांदा विजयी झालेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ यांच्या मताधिक्यात गतवेळच्या तुलनेत घट झाली. मागील निवडणुकीत भुजबळ हे ५० हजारहून अधिकच्या फरकाने निवडून आले होते. यावेळी त्यांनी २६ हजार ४०० मतांनी शिवसेना ठाकरे गटाच्या ॲड. माणिकराव शिंदेंना पराभूत केले. भुजबळांचे मताधिक्य निम्म्याने कमी झाले असले तरी गतवेळी मिळालेल्या मतात मात्र सुमारे नऊ हजारांनी वाढ झाली आहे.