नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यातील संघर्ष आता हातघाईवर आला असून उमेदवार गणेश गिते यांच्या कार्यकर्त्याकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. दुसरीकडे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गिते यांच्या भावाच्या वाहनाची तोडफोड केल्याची तक्रार करण्यात आली आहे. भाजपकडून खुलेपणे गुंडागर्दी होत असून त्यास पायबंद न घातल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार राहुल ढिकले आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) गणेश गिते यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. गुरुवारी दुपारी त्रिकोणी गार्डन परिसरात घडलेल्या घटनेवरून दोन्ही पक्षांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. गिते यांचे कार्यकर्ते पैसे वाटप असल्याची ढिकले समर्थकांची तक्रार आहे तर, संबंधितांकडून मतदार चिठ्ठीचे वाटप होत असल्याचे गिते समर्थकांचे म्हणणे आहे. उपरोक्त ठिकाणी उमेदवाराचे भाऊ गोकुळ गिते हे पोहोचले. तेव्हा त्यांच्या वाहनावर भाजप पदाधिकाऱ्यांनी हल्ला करून तोडफोड केल्याची तक्रार शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यानी केली.

pm modi rally Kharghar
खारघर मोदीमय! भाजपचे हजारो कार्यकर्ते खारघरमध्ये दाखल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
sharad pawar road show chinchwad assembly constituency rahul kalate
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद
Dhananjay munde latest marathi news
भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचे धनंजय मुंडेंसमोर आव्हान
BJP advertisement in major dailies featured slogan Ek Hai To Seif Hain with caps
भाजपच्या जाहिरातीत सर्व जातींच्या टोप्या…एक टोपी मात्र मुद्दाम…
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
Congress complains against BJP advertisement Election Commission explanation of inquiry Print politics news
भाजपच्या जाहिरातीविरोधात काँग्रेसची तक्रार; चौकशी करण्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
Jalgaon vidhan sabha election 2024
जळगाव जिल्ह्यात बंडखोरांवरील कारवाईत भाजपचा दुजाभाव, माजी खासदारास अभय

हेही वाचा : ‘बटेंगे तो कटेंगे’वरून भाजपमध्ये दुफळी, सुप्रिया सुळे यांचा दावा

या घटनाक्रमामुळे खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा होऊ शकली नाही. त्यांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेत आयुक्तांची भेट घेतली. नाशिकमध्ये घडलेला प्रकार धक्कादायक असून भाजपकडून खुलेआम गुंडागर्दी केली जात असल्याचा आरोप सुळे यांनी केला. पोलिसांसमोर ही घटना घडली. उमेदवाराचा भाऊ गोकुळ गिते हे शांतपणे प्रचार, चिठ्ठी वाटप करीत होते. तेव्हा हल्ला करण्यात आला. सत्ताधारी आमच्या लोकांवर हल्ले करीत आहेत. भाजपचे खासदार भर सभेत महिलांना धमकावतात. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, असा प्रश्न त्यांनी केला. नाशिकसह राज्यात आमचे उमेदवार व पदाधिकाऱ्यांबाबत पुन्हा असे प्रकार घडल्यास गृहमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा सुळे यांनी दिला.

शरद पवार गटाचे आरोप भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांनी फेटाळले. नाशिक पूर्व मतदारसंघात सर्रास पैश्यांचा वापर होत आहे. हे थांबले पाहिजे. महापालिकेत सर्वात मोठा घोटाळा केलेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार असल्याचा आरोप ढिकले यांनी केला. त्रिकोणी गार्डन परिसरात गितेंचा कार्यकर्ता पैसे वाटत होता. स्थानिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. गितेंच्या भावाने कार्यकर्त्याला वाचविण्याचा, पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आपली बदनामी करण्यासाठी हा प्रकार होत आहे. उघडउघड पैश्यांचा वापर कुठे होते हे जनतेला माहिती असल्याकडे ढिकले यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा : “महायुतीचे सरकार विचारधारेवर नव्हे, खोक्यावर बनलेले”, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

फडणवीस यांच्या घरासमोर उपोषण करु- सुप्रिया सुळे

सत्ताधारी आमच्या लोकांवर हल्ले करीत आहेत. भाजपचे खासदार भर सभेत महिलांना धमकावतात. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, असा प्रश्न त्यांनी केला. नाशिकसह राज्यात आमचे उमेदवार व पदाधिकाऱ्यांबाबत पुन्हा असे प्रकार घडल्यास गृहमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.