नाशिक : गणरायाला पर्यावरणस्नेही पध्दतीने निरोप देण्यासाठी महानगरपालिकेने विसर्जनासाठी २७ नैसर्गिक तर ५६ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. जल प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती गोदावरीसह उपनद्यांच्या पात्रात विसर्जित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कुणी त्याचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पीओपी मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करता यावे म्हणून अमोनियम बाायोकार्बोनेट पावडर मनपाच्या विभागीय कार्यालयांमधून मोफत दिली जात आहे. मूर्ती दान उपक्रमांतर्गत महापालिका पर्यावरणप्रेमी संस्थांच्या मदतीने ठिकठिकाणी मूर्ती संकलन करणार आहे.

दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणरायाला गुरुवारी निरोप देण्याची तयारी सुरू झाली आहे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणस्नेही पध्दतीने साजरा व्हावा, ध्वनी व जल प्रदूषणासंबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी मनपा, पोलिसांसह सर्व यंत्रणा आग्रही राहिल्या. त्यासाठी विविध उपक्रम राबविले गेले. विसर्जनही त्याच धर्तीवर करण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी विभागवार एकूण २७ नैसर्गिक घाट असून ५६ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रत्येक ठिकाणी मूर्ती आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या मूर्ती महापालिका संकलित करणार आहे, त्यांचे विधीवत पूजन करून विसर्जन केले जाईल.

Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

हेही वाचा : नाशिकमध्ये मिरवणूक मार्गावर ६७ सीसीटीव्ही कॅमेरे, सहा ड्रोनद्वारे नजर; साडेतीन हजार अधिकारी, जवानांचा बंदोबस्तात सहभाग

स्वयंसेवी संस्थांकडून मूर्ती व निर्माल्य संकलनात जनजागृती करण्यात येणार आहे. भाविकांनी निर्माल्य नदीपात्रात टाकू नये. त्यापासून सेंद्रिय खत तयार करता येते. घरातील बगीच्यात ते वापरता येईल यादृष्टीने प्रयत्न केले जातील. पीओपीच्या मूर्ती नदीपात्र वा नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत विसर्जित होऊ नये म्हणून महापालिकेने आधीपासून तयारी केली आहे. मूर्तीकार व विक्रेत्यांना पीओपीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याची सूचना याआधीच दिली गेली होती. विसर्जनाच्या दिवशी नदीपात्रात पीओपी मूर्ती विसर्जनास बंदी राहणार असल्याचे मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी म्हटले आहे. पीओपी मूर्तींचे घरीच विसर्जन करता यावे म्हणून उपलब्ध केलेली अमोनियम बाायोकार्बोनेट पावडर अनेकांनी नेली आहे.

हेही वाचा : नाशिकमध्ये कांदा कोंडी कायम; आजपासून एका उपबाजारात लिलाव

कृत्रिम तलाव व्यवस्था

पंचवटी – पेठ रोडवर आरटीओ कॉर्नर, दत्त चौक गोरक्षनगर, वाघाडी नदी, राजमाता मंगल कार्यालय, नांदुर-मानूर गोदावरी पूल, कोणार्कनगर, आडगाव पाझर तलाव, म्हसरूळ, सिता सरोवर, तपोवन कपिला संगम, रासबिहारी शाळेसमोर प्रमोद महाजन उद्यान, रामवाडी चिंचबन, कमलनगर, रामकुंड परिसर, रोकडोबा सांडवा ते गौरी पटांगण परिसर, गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्वर परिसर.
नाशिक पूर्व – लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठाजवळ आगरटाकळी, रामदास स्वामीनगर बस थांबा, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथनगर चौफुली इंदिरानगर, डीजीपीनगर (गणेश मंदिराजवळ), राणेनगर येथे शारदा शाळेसमोर, कलानगर चौकात राजसारथी सोसायटी.
सातपूर – पाईपलाईन रस्ता रिलायन्स पंपासमोर), धर्माजी कॉलनी, अशोकनगर पोलीस चौकीसमोर, गंगापूर गावाजवळ कोरडेनगर, गंगापूर गाव, साधना मिसळ समोरील विहीर, अंबड लिंक रस्त्यावर एमएसआरटीपी जागेतील विहीर, विनाय संकुल.

हेही वाचा : नाशिक : विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गात बदल

नाशिकरोड – नारायण बापू चौक, तानाजी मालुसरे क्रीडांगण, निसर्गोपचार केंद्रासमोरील क्रीडांगण, शिखरेवाडी मैदान, तोफखाना रस्त्यावर गाडेकर मळा, मनपा शाळा क्रमांक १२५ चे मैदान, राजराजेश्वरी चौक, के.एन. केला शाळेमागील प्रस्तावित भाजी बाजार, सामनगाव रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन.
नाशिक पश्चिम – चोपडा लॉन्स पूल परिसर, चव्हाण कॉलनी (परीची बाग), वन विभाग रोपवाटिका पूल, बॅडमिंटन हॉल येवलेकर मळा, उंटवाडी रस्त्यावरील दोंदे पुलालगत, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, लायन्स क्लब मैदान जुनी पंडित कॉलनी. टाकळी.
सिडको – गोविंदनगर जिजाऊ वाचनालय, राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ, पवननगर जलकुंभ, राजे संभाजी स्टेडिअम, रामनगर येथील डे केअर सेंटर शाळेजवळ, कामटवाडा येथील मिनाताई ठाकरे शाळा, वासननगर येथील गामणे मैदान, गुरु गोविंदसिंग महाविद्यालयासमोर आदित्य हॉल.

हेही वाचा : धुळ्यात विसर्जन मिरवणुकीवर सातशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

नैसर्गिक ठिकाणे

पंचवटी – म्हसरुळमध्ये सीता सरोवर, नांदूर-मानूर गोदावरील पूल, तपोवनात कपिला संगम, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण. आडगाव पाझर तलाव.
नाशिक पूर्व – लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ, नंदिनी गोदावरी संगम, आगरटाकळी.
सातपूर – आनंदवली-चांदसी पुलाखाली, सोमेश्वर मंदिर, अंबड लिंक रोडवरील नंदिनी नदी पूल, गंगापूर धबधबा, आयटीआय पुलाशेजारी.
नाशिकरोड – चेहेडी दारणा नदी घाट, वालदेवी नदी देवळाली गाव, वालदेवी नदीवर विहितगाव व वडनेर गाव, दसक घाट.
नाशिक पश्चिम – यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, टाळकुटेश्वर पुलाजवळ, कपूरथळा पटांगण, सिध्देश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमानघाट, अशोकस्तंभ.
सिडको – वालदेवी नदीवर पिंपळगाव खांब