या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवन सोहळ्याचे औचित्य साधत येथील नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या २३ हजार विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सोमवारी सामूहिक ‘पसायदान’चा सूर आळवला आणि वातावरण भारावून टाकले. संत साहित्याचा अभ्यास आणि पसायदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी हा अभिनव उपक्रम संस्थेच्या माध्यमातून आकारास आला. नजीकच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकराच्या आत्मसमर्पणास ५० वर्षे पूर्ण होत असल्याने ‘जयोत्सुते’चा जयघोष विद्यालय परिसरात निनादणार आहे.

काही हजार शतकांपूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी विश्व कल्याणासाठी ‘पसायदान’चे दान मागत सर्वाचे कल्याण होवो, सर्व आनंदात राहो, अशी प्रार्थना केली. बदलत्या जीवनशैलीत हे संस्कार काहीअंशी पुसले जात असताना सर्वाचे कल्याण हा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावा यासाठी ‘नाएसो’ने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवन सोहळ्याचे औचित्य साधत गीता जयंतीनिमित्त सामूहिक पसायदान उपक्रमाचे आयोजन केले. यासाठी पसायदानाचा मराठीमध्ये भावार्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला. ही रचना प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही समजावी, यासाठी बोलीभाषेत तिचे खंड करत त्यांनाही मुखोद्गत कसे होतील यासाठी विशेष प्रयत्न झाले. दैनंदिन परिपाठानंतर त्याचा सराव प्रत्येक विद्यालयात करण्यात आला. यासाठी संगीत शिक्षक नवीन तांबट आणि त्यांचे सहकारी यांनी पसायदानास संगीत दिले. मुलांनी घरी सराव करावा यासाठी खास लहान आकारातील पुस्तिका तयार करून त्यांना देण्यात आली होती, तसेच परिपाठाच्या आधी संगीतबद्ध पसायदानाची ध्वनिमुद्रिकाही विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आली. यासाठी श्री संत सेवा संघाचे सहकार्य लाभले. या १५ ते २० दिवसांच्या सरावानंतर सोमवारी नाशिक शहर व परिसरात संस्थेच्या सर्व विद्यालयांमध्ये सकाळ व दुपारच्या सत्रात उत्साहपूर्ण वातावरणात हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, शालेय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी संत साहित्य अभ्यासकांच्या विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. पुढील वर्षी विद्यालय स्तरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मसमर्पणास ५० वर्षे पूर्ण होत असल्याने २६ फेब्रुवारी रोजी सावरकरांनी स्वातंत्र्यदेवतेचा केलेला ‘जयोत्सुते’चा जयकार सर्व विद्यालयांमधून पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे