नाशिक : खासगी बचत गटासह बँका आणि अन्य लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्याच्या विंवचनेतुन शेतकऱ्याने आत्महत्या केली. सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथे ही घटना घडली. सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र खाडे (५०) यांनी शेती तसेच अन्य कामासाठी खासगी बचत गट, बँका यासह अन्य काही लोकांकडून उचल घेतली होती. खाडे आणि त्यांचे वडील यांची एकत्र अशी चार एकर जमीन आहे. विहिरीसाठी शिंदेवाडी गावालगत दोन गुंठे जागा घेतलेली आहे. या सर्व कामांपासून बँकेकडून दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. तसेच स्वत:चे घर जामीन देत घरावर बोजा चढवला. याशिवाय वीज वितरण कंपनीचे दीड लाख रुपयांचे विद्युत देयके थकीत आहे. या सर्व नैराश्यातून राजेंद्र खाडे यांनी पिकावर फवारण्यात येणारे विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा