नाशिक – देवळा तालुक्यातील निंबोळा येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. मालेगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही, गुलाबराव पाटील यांचा कोणावर रोख ?

हेही वाचा – नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

निंबोळा येथील प्रगतशील शेतकरी बळीराम देवराम देवरे (५० ) यांच्याकडे दोन एकर जमीन असून, त्यांच्यावर मालेगाव येथील भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे १५ लाख रुपये तसेच एका वित्तीय संस्थेचे १७ लाख रुपये असे एकूण ३२ लाख रुपयांचे कर्ज होते. शेतीमालाला भाव नसल्याने देवरे हे कर्ज फेडू शकले नाहीत. या कर्जाला कंटाळून त्यांनी गुरुवारी शेतात विषारी औषध प्राशन केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचा तलाठी अविनाश गावित यांनी पंचनामा केला आहे.