नाशिक – बनावट पोलीस अधिकारी बनून एका व्यावसायिकाला एक कोटीहून अधिक रकमेला फसविण्यात आल्याचे उघड झाले. संशयिताने बनावट ओळखपत्र दाखवून रेल्वेतील कामाची निविदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली. इतकेच नव्हे तर, संशयिताने पीडित व्यावसायिकांना बंदुकीचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याचेही उघड झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विठ्ठल वाकडे (५६, रा. राणे नगर, सिडको) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित गौरव मिश्रा (३७) याने २०१८ मध्ये त्यांच्याशी ओळख करून घेतली. मिश्रा हा स्वतःला भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असल्याचे भासवत होता. तो नेहमी पोलीस गणवेश परिधान करून लाल-निळ्या दिव्यांच्या गाडीतून फिरत असे. त्याने आपल्याकडे शासनाने दिलेले सुरक्षारक्षक असल्याचे दाखवून वाकडे यांचा विश्वास संपादन केला. मिश्राने वाकडे यांना रेल्वेतील कामाची निविदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. वाकडे यांनी मिश्रावर विश्वास ठेवत एक कोटी सात लाख ८८ हजार १०६ रुपये दिले. रेल्वे डेपो येथे गाड्यांचा पुरवठा, सुरक्षा अनामत, गाड्यांचा खर्च अशा विविध कारणांसाठी हे पैसे देण्यात आले.

हेही वाचा – द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक

हेही वाचा – विम्याचे पैसे मिळावेत म्हणून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव

कालांतराने वाकडे यांना मिश्राच्या बनावटीची जाणीव झाली. त्यांनी मिश्राकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता तो त्यांना टाळू लागला. १३ ऑक्टोबर रोजी मिश्राने वाकडे यांना शहरातील पाथर्डी फाट्यावरील आगरा हॉटेल येथे भेटण्यासाठी बोलावले. तेथे मिश्राबरोबर १०-१२ गुंड होते. मिश्राने वाकडे यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकी दिली. वाकडे यांचे पैसे देण्याऐवजी त्याने वाकडे यांच्याकडेच दरमहा पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली. वाकडे यांनी अंबड पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी मिश्रा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.