महाराष्ट्राला शिल्पकारांची अभिमानास्पद परंपरा लाभली आहे. विनायकराव करमरकर, शिल्पकार तालीम, वाघ, म्हात्रे, सोनवडेकर, राम सुतार असे दिग्गज कलावंत महाराष्ट्राला लाभले. त्यातीलच महत्त्वाचे नाव म्हणजे मदन आणि अरूणा गर्गे. ग. ना. गर्गे, मदन व अरूणा आणि आता तिसऱ्या पिढीतील श्रेयस गर्गे अशा गेल्या शतकभरातील शिल्पकारांच्या तीन पिढ्या नाशिकच्या गर्गे आर्ट स्टुडिओने पाहिल्या.
या तीन पिढ्यांनी घडवलेल्या कलाकृती हा महाराष्ट्राचा वारसा आहे. देशभरात असे फार कमी स्टुडिओ आहेत ज्यांनी शतकोत्सव साजरा केला आहे. म्हणूनच गर्गे आर्ट स्टुडिओचा शतकमहोत्सवी प्रवास महत्त्वाचा ठरतो. या प्रवासातील कलाकार आणि कलाकृती यांचा हा एक कलात्मक धांडोळा!