नाशिक – नाशिकरोड परिसरातील सुभाष रोड येथील बारदान गोदामाला सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाजवळ जुन्या कोर्टच्या मागील बाजूस सोमनाथ बाबा चाळ येथील अन्वर खान, सुकडू खान बारदानवाले यांच्या बारदानच्या गोदामाला सोमवारी सकाळी आग लागली. आगीचे नाशिकरोडमधील विविध भागातून धुराचे लोट दिसत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – नाशिक : द्राक्ष बागायतदाराची १४ लाख रुपयांना फसवणूक

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात तीन घरफोड्या, लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाच्या नाशिक रोड येथील तीन, देवळाली कॅम्प येथील दोन, मुद्रणालयाच्या दोन आणि नाशिक मुख्यालय येथील तीन गाड्यांसह अन्य भागातून आलेले १६ बंब आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. आगीची झळ शेजारील वखारीलाही बसली. आगीवर तीन तासाहून अधिक वेळेनंतर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीत बापू उगले, दिलीप गायकवाड, कृष्णा कुंदे, ललित ठक्कर, कलीम पठाण यांच्या नऊ दुकांनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.