नाशिक – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षवाडी परिसरात पावसामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अवघड झाले आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना नाला ओलांडावा लागत असून नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी गावपाड्यांचा संपर्क तुटत आहे. यापैकी एक हर्षवाडी गाव. हरिहर किल्ला पायथ्याशी असणारी ही ४० पेक्षा अधिक घरे असलेली वाडी आहे. या वाडी परिसरातून एक नाला जातो. यामुळे वाडीचे दोन भाग झाले आहेत. या भागात जिल्हा परिषदेची शाळा आहे. वाडीतील विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. दोन दिवसांपासून नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्याने दुसऱ्या भागाशी असलेला संपर्क तुटला आहे. दोन दिवसांपासून शाळा बंद आहे. शिक्षकही येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
child dies after candy sticks to his throat
पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! गोळी घशात अडकून चार वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; तीन तास कुटुंबियांनी केला संघर्ष, डॉक्टरही झाले हतबल

हेही वाचा – नाशिक : गंगापूर धरण निम्मे भरण्याच्या स्थितीत; भावली तुडुंब, दारणा, नांदुरमध्यमेश्वरमधून विसर्ग

दरम्यान, मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने बांधलेल्या सभागृहात बुधवारी स्थानिकांकडून शाळा भरविण्यात आली. हरिहर किल्लाच्या पायथ्याशी ही वस्ती आहे. किल्ला पर्यटनासाठी पर्यटन विकास महामंडळ कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा दावा होतो. असाच दावा वनविभागाकडून विकास कामे केल्याच्या नावाखाली होतो. परंतु, हा निधी खर्च होऊनही स्थानिकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा – महायुतीतील खदखद चव्हाट्यावर, अजित पवार गटाच्या आमदाराची मंत्र्यांवर टीका

जाणीवपूर्वक दुर्लक्ष

हर्षवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. मुलांनाही जीव मुठीत धरून जावे लागते. शाळेचा रस्ता तयार करावा, अशी मागणी सातत्याने करत आहोत. मात्र शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. – भगवान मधे (एल्गार कष्टकरी संघटना)