लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक – केंद्र सरकारच्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या नोंदणी प्रक्रियेत १३८८ पैकी आतापर्यंत १२५६ ग्रामपंचायतीतील सरपंचांची पीएम विश्वकर्मा पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. सरपंच नोंदणीत राज्यातील सर्वाधिक नोंदणी नाशिक जिल्ह्यात झाल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी सीएमसी केंद्रात जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी

या योजनेअंतर्गत १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना बॅंकेतून अर्थसहाय्य मिळणार आहे. प्रथम वर्षासाठी एक लाखाचे कर्ज पाच टक्के इतक्या कमी व्याजदराने व त्याची परतफेड केल्यानंतर दोन लाख रुपये कर्ज तेही पाच टक्के इतक्याच व्याजदराने असे एकूण तीन लाखांपर्यंत कमी व्याजदराने कर्ज लाभार्थ्यांना मिळेल. या कर्जाला कोणत्याही प्रकारची बॅंक हमी लागत नाही. देशाच्या स्वातंत्र्यदिनी पीएम विश्वकर्मा या योजनेची घोषणा झाली होती. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी संपूर्ण देशात या योजनेची सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर सीएससी केंद्राच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा या पोर्टलवर योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

आणखी वाचा-भुसावळ रेल्वे विभागाला एकाच दिवशी ५० लाखांचे उत्पन्न, तिकीट तपासणी मोहीम

नोंदणी केल्यानंतर प्राथमिक पडताळणी ही गावातील सरपंच यांच्या माध्यमातून होईल. तर द्वितीय पडताळणी ही जिल्हा स्तरावरून होईल. पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याननंतर लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर लाभार्थी हे आपल्या जवळील केंद्रावर प्रशिक्षण नोंदणी करू शकतात. हे प्रशिक्षण पाच दिवसांचे असून प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीना दररोज ५०० रुपये प्रमाणे भत्ता दिला जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उपकरणे खरेदीसाठी १५ हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. यानंतर लाभार्थी व्यवसायाच्या उभारणीसाठी कर्जाची मागणी करू शकतात. या योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत सरपंचांची नोंदणी प्रगतीपथावर आहे. सरपंच नोंदणीत राज्यातील सर्वाधिक नोंदणी नाशिक जिल्ह्यात झाल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी सीएससी केंद्रात नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

Story img Loader