नाशिक : लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा घोळ मिटला असला तरी उमेदवारीवरून मात्र कमालीची रस्सीखेच होत आहे. नाशिकच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने परस्पर जाहीर केलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर भाजपने आक्षेप घेतल्याने पुन्हा नव्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. या जागेसाठी गोडसे यांच्यासह जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यात स्पर्धा आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी महापौर दशरथ पाटील, माजी आमदार राजाभाऊ वाजे, विजय करंजकर यांच्या नावावर विचार होत आहे. दिंडोरीत महायुतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना मैदानात उतरवले. महाविकास आघाडीत शरद पवार गटाच्या वाट्याला आलेल्या जागेवर उमेदवारीसाठी भास्कर भगरे, भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यात चुरस आहे.

लोकसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा होत असून राजकीय पातळीवरील घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत कोणती जागा, कोणत्या पक्षाला मिळणार यावरून घोळ सुरू होता. महायुतीत विद्यमान खासदाराच्या पक्षाला जागा सोडण्याबद्दल राज्यस्तरीय नेत्यांमध्ये एकमत झाले. त्यानुसार नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले. तथापि, पक्षाच्या मेळाव्यात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार गोडसे यांच्या परस्पर जाहीर झालेल्या उमेदवारीला भाजपने आक्षेप घेतल्याने गोडसे यांची उमेदवारी अडचणीत आल्याची स्थिती आहे. या जागेसाठी शिंदे गट जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि उमेदवारी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणारे स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या नावावर विचार करीत असल्याचे सांगितले जाते. परंतु, गोडसे यांनी ती शक्यता फेटाळली. भाजपकडून ऐनवेळी सुचविल्या जाणाऱ्या नावावर शिंदे गटाला विचार करावा लागण्याची चिन्हे आहेत.

Sharad Pawar on chhagan Bhujbal Yeola Assembly Election
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यासमोर येवला मतदारसंघ राखण्याचे आव्हान; शरद पवार भुजबळांच्या विरोधात आक्रमक का?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
Kalyan Dombivli assembly election campaign wage rates labour
कल्याण-डोंबिवलीत प्रचार टिपेला, मजुरीचे दर शिगेला; प्रचारासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर २५० ते १२०० रूपये
all 1676 polling stations in Nashik and Malegaon have CCTV and live webcast
नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….

हेही वाचा : राहुल गांधींच्या रोड शोमध्ये चोरांना गर्दीचा फायदा, पावणेचार लाखांचा ऐवज लंपास

महाविकास आघाडीत वेगळी स्थिती नाही. शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेची संधी हुकलेले विजय करंजकर यांचे नाव जवळपास निश्चित केले होते. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. परंतु, ते कडवी लढत देतील की नाही, याबद्दल मित्रपक्षांकडून साशंकता व्यक्त झाल्याने ठाकरे गटाने पर्यायी नावांचा विचार सुरु केला आहे. नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन प्रस्ताव दिला. सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नावावरही पक्षाकडून विचार होत आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असून पुढील दोन दिवसांत नावे अंतिम होतील, असे सांगितले जाते.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील अपघातात तीन शिवभक्तांचा मृत्यू

दिंडोरीत हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक

दिंडोरी लोकसभा मतदार संघात महायुतीच्या वतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पुन्हा संधी देत आघाडी घेतली आहे. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असताना महाविकास आघाडीत उमेदवारावर एकमत झालेले नाही. अलिकडेच नाशिक दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी दिंडोरीतून भास्कर भगरे यांच्या नावावर विचार होत असल्याचे म्हटले होते. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यांनी या मतदारसंघाचे प्रदीर्घकाळ प्रतिनिधीत्व केले आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांशी लढत देऊ शकेल, अशा सक्षम उमेदवाराचा पक्षाकडून शोध घेतला जात आहे. पुढील दोन दिवसात उमेदवार निश्चित होईल, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी सांगितले.