नाशिक : पत्नीसह सासरच्या जाचास कंटाळून एकाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून ही बाब उघड झाल्यावर मृताच्या वडिलांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी मृताच्या पत्नीसह सासरच्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पंचवटीतील केशव अंतापूरकर (दत्तनगर, कोणार्कनगर) यांनी तक्रार दिली. शितल अंतापूरकर, केदाबाई चव्हाण, वसंत चव्हाण आणि पंकज चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केशव यांच्या तुषार अंतापूरकर या मुलाने मंगळवारी राहत्या घरी गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नीसह सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या मानसिक जाचासह दबावास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आढळून आल्याने मृताच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली. मुलगा तुषार आणि संशयित पत्नी शितल यांचे लग्न २००८ मध्ये झाले होते.

हेही वाचा…नाशिक : शहर पोलीस भरतीत पावसाचा व्यत्यय, पहिल्या दिवशी शहरात २१४, ग्रामीण पोलीस दलाच्या प्रक्रियेत ३०५ उमेदवार गैरहजर

लग्नाच्या दोन महिन्यानंतर ते १८ जून २०२४ पर्यत संशयित पत्नी आणि सासरच्या मंडळींनी मानसिक त्रास दिला, दबाव टाकला. त्यास कंटाळून मुलगा तुषार याच्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय न राहिल्याने त्याने चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तिचे आई-वडील आणि भाऊ यांना अटक केली.