नाशिक – महाराष्ट्र ई वाहन धोरणानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक-बोरिवली मार्गावर १२ मीटरच्या ई बस चालविण्यात येत आहेत. तसेच नऊ मीटर ई बस सप्तश्रृंगी गड, नाशिक-कसारा मार्गावर चालविण्यात येत असून अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय, नाशिक- पिंपळगाव मार्गावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी ई बस सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा आरंभ बुधवारपासून होत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी दिली.

राज्य परिवहन महामंडळाकडून ई वाहन धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक, बोरिवली, कसारा, सप्तश्रृंगी गड या मार्गांवर ई बससेवा सुरू आहे. या ताफ्यात नव्याने १२ बस दाखल झाल्या आहेत. या बसची आसन क्षमता ४४ असून ती आरामदायी आहे. सदरची बससेवा वातानुकूलीत आहे. बसमध्ये दिव्यांची विशेष सुविधा आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीचीही सुविधा आहे. महिला सन्मान योजनेतंर्गत ५० टक्के, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० टक्के सवलत, अर्जुन -द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त पुरस्कारार्थींसाठी १०० टक्के, विद्यमान तसेच माजी विधानसभा, विधान परिषद सदस्य, शहीद सन्मान योजने अंतर्गत शहीद जवानांच्या वीरपत्नी यांना १०० टक्के सवलत या बस प्रवासासाठी देण्यात आली आहे.

unannounced holiday Schools Nashik,
मतदान केंद्रांमुळे शाळांना तीन दिवसांची अघोषित सुट्टी ? शालेय व्यवस्थापनाकडून पर्यायांची चाचपणी
Nashik, traffic Nashik, roads city traffic Nashik,
नाशिक : आज, उद्या शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी…
Accident in Jalgaon District, Accident election staff vehicle, Jalgaon District, A
जळगाव जिल्ह्यात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात, चार जण जखमी
Nashik Traffic congestion, Nashik, Nashik campaign,
नाशिक : प्रचार फेऱ्यांमुळे वाहतूक कोंडी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :| Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
११० पोलीस वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे; मद्य, गुटखा, शस्त्रास्त्रे जप्त
Maharashtra vidhan sabha election 2024 district collector order to evacuate outsider political parties workers in Nashik west assembly constituency
आयात राजकीय कार्यकर्त्यांनो, मतदारसंघाबाहेर निघा…;  बाहेरील मंडळींच्या छाननीसाठी शोध मोहीम
The dilemma of women who say let them go home while Eknath Shinde speech is going on nashik news
एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना घरी जाऊ द्या म्हणणाऱ्या महिलांची कोंडी
Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
chhagan bhujbal vs manikrao shinde
लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान

हेही वाचा – मतदान केंद्रांमुळे शाळांना तीन दिवसांची अघोषित सुट्टी ? शालेय व्यवस्थापनाकडून पर्यायांची चाचपणी

हेही वाचा – नाशिक : आज, उद्या शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद

सद्यस्थितीत नाशिक-बोरिवली मार्गावर धावणाऱ्या नऊ मीटर ई बस या सप्तश्रृंगी गड, नाशिक- कसारा आणि नाशिक- पिंपळगाव मार्गावर धावत आहेत. त्यामुळे नाशिक -सप्तश्रृंगी गड मार्गावर सहा तर नाशिक कसारा मार्गावर दोन अतिरिक्त फेऱ्या सुरू होणार आहेत. नाशिक पिंपळगाव मार्गावर नव्याने ई बस सेवेच्या आठ फेऱ्या सुरू होत असल्याची माहिती सिया यांनी दिली. फेऱ्यांचा लाभ प्रवाश्यांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.