महानगरपालिकेच्या सिटीलिंक या शहर बस सेवेचा तोटा भरून काढण्यासाठी केलेली सुमारे सात टक्के भाडेवाढ बुधवारी मध्यरात्रीपासून लागू होत आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या खिशावर अधिकचा भार पडणार आहे.

महानगरपालिकेने जुलै २०२१ पासून सुरू केलेली सिटीलिंक बससेवा प्रारंभापासून तोट्यात आहे. त्याचा मोठा आर्थिक भार महापालिकेवर पडत आहे. उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात असल्या तरी अद्याप ही बससेवा नफ्यात आलेली नाही. त्यात इंधन आणि गॅसच्या वाढत्या दराचा बोजा बस सेवेवर पडत आहे. सिटीलिंकतर्फे शहर आणि आसपासच्या भागात सुमारे २३० बस चालविल्या जातात. त्यातील सुमारे ८० टक्के बस सीएनजी गॅसवर आधारीत तर उर्वरित डिझेलवर आहेत. इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाढता तोटा लक्षात घेऊन दरवाढीचा विचार सुरू होता. सात टक्क्यांच्या जवळपास ही दरवाढ आहे. पाच टक्क्यांहून अधिक दरवाढ असल्याने याबाबत सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेणे बंधनकारक होते. ही मान्यता घेऊन दरवाढीचा निर्णय घेतला गेल्याचे सिटीलिंकने म्हटले आहे.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

हेही वाचा >>> हतनूर धरण जलाशयावर १४९ पक्षी प्रजातींची नोंद; वनपरिक्षेत्र अधिकारी, चातक निसर्ग संवर्धन संस्थतर्फे आशियाई पाणपक्षी गणना

१५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून नवीन भाडेवाढ लागू केली जात आहे. ही भाडेवाढ एक जानेवारी रोजीच लागू होणार होती. ती दीड महिना उशिराने लागू केली जात आहे. इंधन दरात वाढ होऊनही प्रवासी हिताचा विचार करत कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ न करता केवळ नियमांनुसार भाडेवाढ करण्यात आल्याचे सिटीलिंकने म्हटले आहे. सुखकर, अद्ययावत, सुरक्षित प्रवास नाशिककरांना उपलब्ध करून देण्यासाठी सिटीलिंक प्रयत्नशील असून प्रवाश्यांनी भाडेवाढीच्या निर्णयास सहकार्य करावे, अशी सिटीलिंकची अपेक्षा आहे.

नवीन भाडे कसे ? निमाणी ते बारदान फाटा (मार्गे सातपूर, श्रमिकनगर) तसेच निमाणी ते म्हाडा (सातपूरमार्गे) या प्रवासासाठी पूर्वी ३२ रुपये असणारे तिकीट आता ३५ रुपये असेल. निमाणी ते सिम्बॉयसिससाठी ३० रुपये (जुने २७), निमाणी ते नाशिकरोड ३५ रुपये (३२), निमाणी ते आडगाव (३० रुपये (२७), नाशिकरोड रेल्वे स्थानक ते बारदान फाटा ४५ रुपये (४२), नाशिकरोड रेल्वे स्थानक ते सिम्बॉयसिस महाविद्यालय ४० रुपये (३२), नाशिकरोड ते अंबड गाव ४० (३७), नाशिकरोड रेल्वे स्थानक ते मखमलाबाद ३५ रुपये (३२), नाशिकरोड रेल्वे स्थानक ते तवली फाटा ४० रुपये (३७ रुपये) अशी भाडे आकारणी होणार आहे. शहरांतर्गत काही मार्गावर प्रवासात साधारणत: तीन रुपये ते आठ रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि आसपासच्या गावांमध्ये दरवाढीची अधिक प्रमाणात झळ बसणार आहे.