अनधिकृत बांधकामांविरोधात लुटुपुटुची लढाई
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची अनधिकृत बांधकामांविरोधात लुटुपुटुची लढाई कायम असून वडाळा रोड, पखाल रोड परिसरातील काही अतिक्रमणे या विभागाने जमीनदोस्त केली. अधूनमधून ही मोहीम राबवत पालिका आपले अस्तित्व अधोरेखित करत आहे.
सिंहस्थाआधी पालिकेने प्रमुख मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी धडक मोहीम राबविली होती. कुंभमेळा झाल्यावर पालिकेने या मोहिमेकडे कानाडोळा केला. तुर्तास अधूनमधून काही अतिक्रमणे हटविली जातात. त्याची प्रचीती वडाळा रस्त्यावरील रेहनुमानगर आणि भाभानगरच्या पखाल रस्त्यावर आली. वाहनतळाच्या जागेवर, सार्वजनिक ठिकाणी केलेली बेकायदेशीर बांधकामे काढून घेण्याबाबत वारंवार आवाहन करूनही अतिक्रमणधारक दाद देत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. ज्यांनी अतिक्रमणे काढून घेतली नाहीत, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. त्या अनुषंगाने सुग्रा पार्क येथील अनधिकृत कार्यालय हटविण्यात आले.
याच भागातील गयास रफीक शेख यांचे पक्के बांधकाम, हाजी अय्युबखान युसूफखान यांच्या पक्क्या खोलीचे बांधकाम, लोखंडी पत्र्याचे शेड असे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
पोलीस बंदोबस्त असल्याने मोहीम शांततेत पार पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा