लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक – गणरायाला पर्यावरणस्नेही पध्दतीने निरोप देण्यासाठी महानगरपालिकेने विसर्जनासाठी २९ नैसर्गिक गणेश विसर्जन स्थळ तर ५६ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. याशिवाय पाच ठिकाणी नैसर्गिक आणि कृत्रिम अशी एकत्रित विसर्जनाची व्यवस्था राहणार आहे. नाशिकरोड विभागात फिरत्या तलावाव्दारे मूर्ती संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोदावरीसह तिच्या उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका दरवर्षी मूर्ती दान उपक्रम राबविते. त्या अंतर्गत कृत्रिम वा नैसर्गिक तलावात गणेशाचे विसर्जन करून मूर्ती महापालिकेच्या स्वाधीन करणे अभिप्रेत असते. या मूर्ती संकलित करून महापालिका विधीवत त्यांचे विसर्जन करते. अतिशय व्यापक प्रमाणात, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबविला जात आहे. यंदाही महापालिका पर्यावरणप्रेमी संस्थांच्या मदतीने ठिकठिकाणी मूर्ती संकलन करणार आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मूर्ती व निर्माल्य संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिकरोड विभागासाठी फिरत्या तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामार्फत संपूर्ण नाशिकरोडमधून मूर्ती संकलन करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी गणेशभक्तांनी जास्तीत जास्त मूर्ती दान करून जलप्रदूषण टाळण्यास पुढाकार घ्यावा, ,असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी केले आहे.

हेही वाचा >>>रोहयोतील कामाच्या मजुरीची दोन महिन्यांपासून प्रतिक्षा; केंद्रासह राज्य सरकारकडे रक्कम थकीत

कृत्रिम तलावांची ठिकाणे

नाशिक पूर्व विभाग – लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठाजवळ, रामदास स्वामीनगर, नंदिनी-गोदावरी संगम, साईनाथनगर चौफुली, डीजीपीनगर गणपती मंदिराजवळ, शारदा शाळा (राणेनगर), कलानगर चौक, राजसारथी सोसायटी

नाशिक पश्चिम – चोपडा लॉन्स पूल, चव्हाण कॉलनी परीचा बाग, गंगापूर रस्त्यावरील वन विभाग रोपवाटिका, येवलेकर मळा (बॅडमिंटन सभागृह), उंटवाडी रस्त्यावरील दोंदे पूल, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, नवीन पंडित कॉलनीतील लायन्स क्लब बगीचा

पंचवटी विभाग – पेठरोड आरटीओ कॉर्नर, दत्तचौक गोरक्षनगर, वाघाडी नदीजवळ राजमाता मंगल कार्यालय, नांदूर-मानूर गोदावरी पूल, कोणार्कनगर, आडगाव पाझर तलाव, म्हसरूळ सिता सरोवर, तपोवन कपिला संगम, प्रमोद महाजन उद्यानाजवळ रासबिहारी शाळेसमोर, रामवाडी चिंचबन, कमलनगर, रोकडोबा सांडवा ते गौरी पटांगण

सातपूर – पाईपलाईन रोड (रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ), शिवाजीनगर येथील धर्माजी कॉलनी, अशोकनगर पोलीस चौकीजवळ

नाशिकरोड – नारायण बापू चौक, राजराजेश्वरी चौक, तानाजी मालुसरे क्रीडांगण, निसर्गोपचार केंद्रासमोरील क्रीडांगण, सामनगाव रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन, के. एन. केला शाळेसमोरील प्रस्तावित भाजी बाजार, शिखरेवाडी मैदान, तोफखाना रस्त्यावरील गाडेकर मळा, मनपा शाळा क्रमांक १२५ मैदान

नवीन नाशिक – गोविंदनगर जिजाऊ वाचनालय, राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ (जुने सिडको), राजे संभाजी व्यायामशाळेजवळ ((कर्मयोगीनगर), राजे संभाजी स्टेडिअम, अंबड पोलीस ठाणे चौक, मिनाताई ठाकरे शाळा, पवननगर जलकुंभ, डे केअर शाळा, गामणे मैदान, अंजना लॉन्स, पिंपळगाव खांब

हेही वाचा >>>नाशिक : चोरचावडी धबधब्याजवळ बुडून युवकाचा मृ़त्यू

नैसर्गिक घाट, स्थळ

नाशिक पूर्व – लक्ष्मी नारायण घाट, रामदास स्वामी मठ, नंदिनी-गोदावरी संगम

नाशिक पश्चिम – यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, टाळकुटेश्वर पुलाजवळ, कपूरथळा पटांगण, सिद्धेश्वर मंदिर

पंचवटी – रामकुंड परिसर, गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्वर पूल, म्हसरूळ सिता सरोवर, आडगाव पाझर तलाव, तपोवन कपिला संगम

सातपूर – गंगापूर धबधबा, सोमेश्वर मंदिर, चांदशी पूल, शहीद चित्ते पूल, अंबड लिंक रस्तावरील नासर्डी पूल, आयटीआय पूल

नाशिकरोड – गोदावरी नदीवर दसक गाव आणि दसक गावठाण, दारणा नदीवरील चेहेडी गाव आणि चाडेगावलगत, वालदेवी नदीवरील देवळाली गाव, विहितगाव, वडनेर गाव

नवीन नाशिक – अंबड गाव आणि पाथर्डी गावातील विहीर

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik municipal corporation made a natural ganesh immersion site for ganesh immersion 2024 amy