महापालिका-पोलिसांची संयुक्त कारवाई; बाजारपेठ, भाजी बाजार, दुकान परिसरात पाच जणांना एकत्र येण्यास मनाई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक : टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होत असताना दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणे, भाजी बाजार आणि बाजारपेठेतील गर्दी कमी होत नसल्याने करोनावर नियंत्रण मिळवणे अवघड होत आहे. मुखपट्टी परिधान न करणारे, थुंकीबहाद्दरांवर आता महापालिका आाणि पोलीस संयुक्त कारवाई करणार आहेत. याअंतर्गत नियमभंग करणाऱ्यांची छायाचित्रे टिपली जातील.
न्यायालयात पुरावा म्हणून ती सादर केली जाणार आहेत. दुकान परिसरात पाचपेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित असल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याशिवाय, बाजारपेठ, भाजीबाजार आदी सार्वजनिक ठिकाणी पाच अथवा पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास, गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
शहरातील करोनाबाधितांची संख्या ५५ हजारांचा टप्पा ओलांडत असताना त्यापैकी ४९ हजार ६७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर ७७६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या चार हजारहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. निर्बंध शिथिल होत असताना नागरिकांकडून करोनाच्या नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मर्यादा येतात. यामुळे पोलिसांचे सहकार्य मिळाल्यास कठोरपणे ही मोहीम राबविता येईल. त्यासाठी महापालिकेने शहर पोलिसांना संयुक्त कारवाईसाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती.
महापालिकेची ही विनंती पोलिसांनी मान्य केली असून शहरात संयुक्त कारवाई सुरू होत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि महापालिकेचे वॉर्ड अधिकारी गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठ परिसरात संयुक्त मोहीम राबवतील.
सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी परिधान करणे बंधनकारक आहे. दोन व्यक्तींमध्ये सहा फूट अंतर राखणे बंधनकारक आहे. दुकानांसमोर सुरक्षित अंतर राखणे तसेच दुकान परिसरात पाचपेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहणे दंडनीय आहे. पालिका आयुक्तांच्या केलेल्या विनंतीनुसार पोलीस आयुक्त पांडे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना संयुक्त कारवाईचे निर्देश दिले. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई होईल. कारवाईवेळी भ्रमणध्वनीतून छायाचित्र काढले जाईल. नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल. त्या वेळी छायाचित्र अतिरिक्त पुरावा म्हणून सादर केला जाणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांना न्यायालयाने दंडात्मक कारवाई केल्यास कारवाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना १०० रुपये बक्षीस दिले जाईल.
दुकाने उघडण्यासाठी दुकानदारांना सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेचे बंधन राहील. सामाजिक, राजकीय, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक कार्यक्रम, मोठय़ा प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवरील बंदी कायम आहे. विवाह सोहळ्यासाठी अधिकतम ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्ती सुरक्षित अंतराचे पथ्य पाळून उपस्थित राहू शकतील, असे पांडे यांनी आदेशात म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास, पान, गुटखा, तंबाखू आदींचे सेवन करण्यास प्रतिबंध आहे.
१३ ठिकाणी गर्दी करण्यास प्रतिबंध
सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, गर्दी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. भद्रकाली, रविवार कारंजा, त्रिमूर्ती चौक, द्वारका, सिटी सेंटर मॉल परिसर, मध्यवर्ती बस स्थानक, मेहेर सिग्नल, शालिमार, बिटको चौक, रेल्वे स्थानक परिसर, दत्त मंदिर चौक, लेखानगर, पाथर्डी फाटा या आणि इतर ठिकाणी नागरिक किराणा, फळे, भाजीपाला खरेदी वा तत्सम कारणांसाठी गर्दी करणार नाहीत.