नाशिक : सर्वच राजकीय पक्षांनी रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांवरून महापालिकेला खिंडीत गाठले असताना सर्वसाधारण सभेत प्रशासनाने रस्ते डांबरीकरण, डागडुजी व दुरुस्तीच्या सुमारे ३४ कोटींच्या कामांना मान्यता दिली. मनपा आयुक्त डॉ अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध भागातील रस्त्यांच्या कामांचा विषय घेतला. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांनी त्यावरून बरीच आंदोलने केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : मुंबईला वीज देण्यासाठी नाशिकमध्ये भारनियमन

खड्ड्यांमुळे अनेक भागात वाहतूक कोंडी होते. वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. यावरून मनपा प्रशासन लक्ष्य होऊ असल्याने यातून सुटका करून घेण्यासाठी सरसकट अनेक रस्त्यांचे डांबरीकरण, अस्तरीकरण, डागडुजीसाठी ३३.५७ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये शांताराम बापू वावरे चौक ते केटीएचएम उड्डाणपूल कॉलनी रस्ता, कुलकर्णी गार्डन ते मायको चौक, साधू वासवानी रोड, होलाराम कॉलनी, मते नर्सरी रोड मधुर स्विट ते नेर्लिकर चौक, नरसिंहनगर ते तिरूपती चौक, नंदन स्वीट ते शहीद सर्कल रस्ता, सिडकोतील खतप्रकल्प कत्तलखाना ते संरक्षक भिंतीपर्यंतचा रस्ता, मिशन मळा, भामरे मिसळ ते रणभूमी, बारा बंगला चौक ते हॉटेल सिबल, पंचवटीत प्रभाग सहामधील रस्ता, अनुसया नगर, कर्णनगर, ओमनगर, नामको रुग्णालयामागील रस्ता आदी रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण, दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे.