नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या जागा आणि इमारतींवर भ्रमणध्वनी मनोरे भाडेतत्वावर उभारण्यासाठी महापालिकेने इच्छुक भ्रमणध्वनी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. यासाठी महानगरपालिकेने स्वमालकीच्या १० जागांची निश्चिती केली आहे. यात नाशिक पूर्व विभागातील चार, नाशिक पश्चिम, पंचवटी व नाशिकरोड विभागातील प्रत्येकी दोन आणि सातपूर विभागातील एका जागेचा समावेश आहे.

दूरसंचार पायाभूत सुविधा धोरणानुसार शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या जागांवर भ्रमणध्वनी मनोरे उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार भ्रमणध्वनी कंपन्यांकडे स्वत:चे दूरसंचार जाळे व वैध दूरसंचार परवाना असणे आवश्यक आहे. अशा भ्रमणध्वनी कंपन्यांना मनोरे उभारण्यासाठी मनपा कर विभागाने भाडेतत्वावर जागा देण्यासाठी काही अटी-शर्तींना अधिन राहून प्रस्ताव मागविले आहेत. या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. भाडे रक्कम निश्चित करताना प्रचलित शीघ्र सिद्ध गणकानुसार जमिनीच्या आठ टक्के प्रतिवर्ष याप्रमाणे येणारे भाडे किंवा रुपये १२ हजार (एक ते १०० चौरस फूट) यापैकी जे जास्त असेल त्यानुसार भाड्याची रक्कम आकारण्यास तसेच प्रति बुस्टरसाठी प्रति माह साडेचारप्रमाणे भाड्याची रक्कम आकारली जाणार आहे.

Due to low response to half marathon police are forced to fill 300 applications and focus on ticket sales affecting law and order
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सोडून नागपुरातील ठाणेदार विकतायेत तिकीट…. प्रत्येकाला तीनशे…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Belapur cidco parking news in marathi
नवी मुंबई : सिडको मंडळाचे वाहनतळ धोकादायक स्थितीत
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Navi Mumbai corporation new policy car Parking problem
नवी मुंबईत पार्किग कोंडीवर अखेर उतारा, महापालिकेच्या नव्या धोरणात मुबलक पार्किंगचे नियोजन

हेही वाचा…टिटवाळ्यातील तीन भाविकांचा अपघातात मृत्यू; इगतपुरीमधील घोटीसिन्नर रस्त्यावर दुर्घटना

भ्रंमणध्वनी, मनोरा कंपनीला निश्चित केलेल्या प्रति मासिक भाड्याच्या तीन महिन्याचे भाडे सुरक्षा अनामत रक्कम म्हणून भरणा करावी लागणार आहे. भ्रमणध्वनी मनोरा उभारणीसाठी जास्तीतजास्त अनुज्ञेय क्षेत्र एक ते १०० चौरस फूटपेक्षा जास्त नसावे. त्यापेक्षा जास्त क्षेत्राची आवश्यकता असल्यास अतिरिक्त भाडे आकारणी केली जाणार आहे. भ्रमणध्वनी मनोरा उभारण्याची परवानगी पाच वर्षांसाठी वैध असेल. दरवर्षी भाडे रकमेत १० टक्के दराने दरवाढ करण्यात येईल. एकाच जागेसाठी दोन स्वतंत्र भ्रमणध्वनी कंपन्यांची मागणी असल्यास जो जास्त भाडे देईल त्याला ती दिली जाणार आहे. मनोरा उभारण्यासाठी लागणाऱ्या वाहतूक पोलीस व इतर शासकीय विभागांची परवानगी घेण्याची जबाबदारी कंपनीवर राहील. भ्रमणध्वनी मनोऱ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागणार आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी २२ जुलै अंतिम मुदत आहे.

हेही वाचा…शासकीय आयटीआयमध्ये राज्यातील पहिले इ ग्रंथालय

भ्रमणध्वनी मनोऱ्यासाठी निश्चित केलेल्या जागा

-विस्डम स्कूल, सिरीन मेडो़ज, गंगापूर रोड)
-घाडगेनगर, गायखे कॉलनी, देवळाली, नाशिकरोड
-जाखडीनगर, बीएसएनएल कार्यालयाजवळ, इंदिरानगर
-इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, कमोदनगर
-वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सुदर्शन मंगल कार्यालयासमोर रस्त्यावरील दुभाजक
-परमपूज्य रविशंकर मार्गावरील दुभाजक
-आकाशवाणी टॉवर, भाजी मार्केटजवळ, मनपा मालकीची इमारत
-प्रमोदनगरमधील गोदावरी नदीलगत मनपा मालकीचा मोकळा भुखंड
-मनपा पाण्याची टाकी, तुलसाई उद्यानाजवळ, दत्तात्रयनगर, हनुमाननगर, पंचवटी
-मनपा रोड दुभाजक, गोरक्षनगर उद्यानाजवळ, म्हसरूळ पोलीस चौकीजवळ, स्नेहनगर, म्हसरूळ

खासगी जागांवर ८०० मनोरे

शहरात विविध भ्रमणध्वनी व मनोरा कंपन्यांचे अंदाजे ८०० मनोरे आहेत. शहरातील खासगी जागा व इमारतींवर हे मनोरे उभारण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, स्वत:च्या जागा भाडेतत्वावर देऊन अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी महापालिकेने पावले टाकली आहेत.

Story img Loader