महापालिकेवर महिन्याला ६० लाखाचा बोजा

अनिकेत साठे, नाशिक

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा

आकाशवाणी केंद्राजवळील आरक्षित भूखंडाचा मोबदला म्हणून प्रशासनाने २१ कोटी रुपये परस्पर मालकास दिल्यावरून सत्ताधारी भाजपमध्ये वादंग उडाले असले, तरी शहरातील भूसंपादनाच्या सहा प्रस्तावांच्या अंतिम निवाडय़ासाठी रक्कम न दिल्याने महापालिकेला दररोज दोन लाख रुपये व्याज म्हणून भरावे लागत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे महिन्याला ६० लाख, तर वर्षांला सात कोटीहून अधिकचा बोजा पालिका तिजोरीवर पर्यायाने नाशिककरांवर पडत आहे. आकाशवाणी केंद्रालगतच्या प्रकरणात अंतिम निवाडय़ासाठी दरास मान्यता मिळालेली नाही. त्यासाठी पालिकेने आतापर्यंत ५० कोटी जमा केले असले तरी दरात फेरबदल झाल्यास त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील स्थायी समितीचा विरोध डावलून भूखंडाचा मोबदला दिल्यावरून भाजपमध्ये कलह निर्माण झाला आहे. स्थायी सभापतींविरोधात भाजप सदस्यांनी आंदोलन केले. या घटनाक्रमाने आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवला असला तरी वास्तव त्यापेक्षा वेगळे असल्याचे दिसत आहे. भूसंपादनाची रक्कम देण्यास कालापव्यय होत असल्याने पालिकेवर मोठा बोजा पडत आहे. जिल्हा प्रशासनाने वारंवार स्मरणपत्र पाठवूनही पालिका प्रतिसाद देत नाही. पालिकेच्या सहा भूसंपादन प्रस्तावांपैकी चार प्रारूप निवाडय़ांना मान्यता मिळाली तर दोन प्रारूप निवाडे मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेत आहेत. या सर्व प्रस्तावांमध्ये कलम १९ची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंतिम निवाडा जाहीर होईपर्यंत १२ टक्के व्याज द्यावे लागते. त्यासाठी एकूण ५१ कोटी ५३ लाख ३१ हजार ५६७ ची मागणी करण्यात आली. या प्रकरणांत पालिका दर दिवशी एक लाख ८५ हजार ८८४ रुपये इतके व्याज भरत आहे. परिणामी, पालिकेवरील बोजा वाढत आहे. अंतिम निवाडा घोषित करण्यासाठी निवाडय़ाची उर्वरित रक्कम जमा केली जात नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पालिकेतील घटनाक्रमाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सव्‍‌र्हे क्रमांक ७०५ मधील आरक्षित भूखंडाच्या मोबदला स्वरूपात सुमारे २१ कोटी रुपये नियमानुसार देण्यात आल्याचे सांगितले. तत्कालीन पालिका आयुक्तांनी भूसंपादनासाठी अंदाजपत्रकात १०० कोटींची तरतूद केली आहे. त्यातून ही रक्कम देण्यात आली. भूखंडाचा मोबदला देण्यासाठी इतर कामांचा निधी वळविण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

सव्‍‌र्हे क्रमांक ७०५ मधील दर निश्चिती प्रलंबित

आकाशवाणी केंद्रालगतच्या सव्‍‌र्हे क्रमांक ७०५ मधील आरक्षित भूखंडासाठी भूसंपादन कार्यालयाने रेडीरेकनरच्या दरसूचीतील मार्गदर्शक तत्त्वानुसार निवाडय़ाची अंदाजित रक्कम ५० लाख ९० हजार ३९ हजार ३४३ इतकी गृहीत धरली होती. त्या अनुषंगाने महापालिकेने आतापर्यंत २९ कोटी ६४ लाख, तर नुकतेच २१ कोटी असे जवळपास ५० कोटी रुपये जमा केले आहेत. परंतु, ही रक्कम देऊनही अंतिम निवाडा जाहीर होणे अवघड आहे. शासनाने ऑगस्टच्या परिपत्रकानुसार नोंदणी, मुद्रांक विभागाच्या रेडीरेकनरमधील मार्गदर्शक सूचना विचारात न घेता केवळ वार्षिक बाजारमूल्य दरानुसार मोबदल्याच्या रकमेची परिगणना करण्याचे निर्देश दिले. यानुसार उपरोक्त रक्कम द्यायची वेळ आल्यास पालिकेवर अधिक बोजा पडण्याची शक्यता आहे. या संदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. दर निश्चित झाल्यानंतर त्याची स्पष्टता होईल. २१ कोटी रुपये देऊनही अंतिम निवाडा होईपर्यंत या प्रकरणात व्याजापोटी दररोज ७३ हजार ६१७ रुपयांचा बोजा पडणार आहे.

Story img Loader