लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातास कारक ठरलेल्या पेठ रस्त्याच्या नुतनीकरणासाठी राज्य शासन आणि स्मार्ट सिटी कंपनीकडून निधी मिळण्याची शक्यता दुरावल्याने अखेर साडेपाच किलोमीटरच्या रस्ता काँक्रिटीकरणाची जबाबदारी महापालिकेने आपल्या शिरावर घेतली आहे. या कामासाठी सुमारे ४५ कोटींच्या खर्चाला मान्यता देताना अंदाजपत्रकात शहरातील रस्ते बांधणीसाठी राखीव निधी या कामासाठी वळविला जाणार आहे.

nashik salher fort murder
नाशिक : जमिनीच्या वादातून साल्हेर किल्ल्यावर दुहेरी हत्याकांड
16 candidates saved their deposit nashik
नाशिक जिल्ह्यात केवळ १६ उमेदवारांना अनामत वाचविणे शक्य
nashik vidhan sabha marathi news
नाशिकमध्ये ज्येष्ठतेच्या निकषावर मंत्रिपद देताना कसरत, भाजपला गतवेळची कसर भरून काढण्याची संधी
north Maharashtra vidhan sabha election result
उत्तर महाराष्ट्रात मविआच्या चारचौघी पराभूत, महायुतीच्या तिघी विजयी
MLA Kashiram Pawara, known as BJPs Amrish Patels shadow won in Shirpur for fourth time
काशिराम पावरा यांच्या सर्वाधिक मताधिक्याच्या विजयामागे कोणाचा हात ?
In Jalgaon District assembly elections 139 candidates contested and 117 candidates deposits were confiscated
जळगाव जिल्ह्यात ११७ उमेदवारांची अनामत जप्त
nashik Suburban police detained two members of eight member gang planning robbery with weapons
दरोड्याच्या तयारीतील दोघे ताब्यात
Nashik Pune bus service blocked passengers for over an hour on Sunday evening
कमी बससंख्येमुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंब

पेठ रस्त्यावरील राऊ हॉटेल ते मनपा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा विषय अनेक वर्षांपासून रखडला आहे. मनपा हद्दीबाहेरील रस्ता काँक्रिटीकरणयुक्त असताना शहरातील डांबरी रस्त्याची वाट लागली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावर वारंवार अपघात होतात. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे धुरळा उडतो. रस्त्याच्या नुतनीकरणासाठी स्थानिकांनी अनेकदा आंदोलने करून रोष प्रगट केला आहे. साडेपाच किलोमीटरच्या रस्ता काँक्रिटीकरणासाठी सुमारे ५० कोटींच्या निधीची गरज भासणार होती. राज्य शासन वा स्मार्ट सिटीमार्फत तो मिळविण्यासाठी महानगरपालिकेने धडपड केली. परंतु, त्यात अपयश पदरी पडल्याने महानगरपालिकेलाच हे काम करावे लागणार आहे.

हेही वाचा… कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे नाशिक महापालिकेचे अंशत: काम आता कंत्राटी पद्धतीने; ‘या’ सेवांचे खाजगीकरण…

सर्वसाधारण सभेत या संदर्भातील सादर झालेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. सद्यस्थितीत पेठ फाटा ते गंगापूर डावा तट कालवा या १.७० किलोमीटरच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. उर्वरित साडेपाच किलोमीटरचा डागडुजी केलेला डांबरी रस्ता भविष्यात कितपत तग धरेल, याबाबत खुद्द महापालिकेला साशंकता आहे. त्यामुळे हे काम करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन ४४ कोटी ९९ लाख रुपयांचे प्राकलन तयार करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात या कामासाठी सात कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. उर्वरित ३७ कोटी ९९ लाखांची व्यवस्ता मनपा अंदाजपत्रकातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी केलेल्या ५० कोटींच्या तरतुदीतून करण्यात येणार आहे. या निधीतून साडेपाच किलोमीटरचा रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी ४४ कोटी ९९ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी देण्यात आली.